India Post Recruitment 2021 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी, जाणून घ्या कोण आणि कसं करू शकतात अर्ज
सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे.
मुंबई : सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे. इंडिया पोस्टमध्ये भरती निघाली आहे आणि महाराष्ट्र सर्कलसाठी त्यांना 257 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. यावर अर्ज करण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट dopsportsrecruitment.in वर जाऊन अर्ज करू शकतात. जारी केलेल्या माहितीनुसार ही भरती क्रीडा कोट्यातील उमेदवारांसाठी आहे. या अंतर्गत उमेदवार 27 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.
पोस्ट आणि एकूण जागा
येथे एकूण 257 पदांसाठी ही भरती करण्यात आली आहे. यामध्ये पोस्टल असिस्टंटसाठी 93, शॉर्टनिंग असिस्टंटसाठी 9, पोस्टमनसाठी 113 आणि एमटीएससाठी 42 जागांची भरती केली जाणार आहे.
पात्रता आणि वयोमर्यादा
पोस्टल असिस्टंट/पोस्टमन या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असावेत.
पोस्टल असिस्टंट/पोस्टमनसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे आणि MTS साठी 18 ते 25 वर्षे असावे.
तसेच SC/ST ला पाच वर्षे, OBC तीन वर्षे, PWD सामान्य श्रेणी 10 वर्षे, PWD SC, ST 15 वर्षे, PWD OBC 13 वर्षे सूट मिळेल.
पगार
पोस्टल असिस्टंट, शॉर्टिंग असिस्टंटसाठी वेतनश्रेणी रुपये 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपये आहे. पोस्टमनचे वेतनमान 21 हजार 700 ते 69 हजार100 रुपये आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना वाचणे आवश्यक आहे.
महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख - 28 ऑक्टोबर 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 नोव्हेंबर 2021
याप्रमाणे अर्ज करा
या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. तुम्ही https://dopsportsrecruitment.in/ला भेट द्या. येथे भरती विभागात क्लिक करून तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते भरा.