मुंबई: भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळणं म्हणजे नशीब उजळण्यासारखी गोष्ट आहे. भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका. 10 वी पास असलेल्या उमेदवारांसाठी रेल्वेच्या जागा निघाल्या आहेत. नॉर्थ सेंट्रल रेल्वेकडून अप्रेंटिसच्या रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख कधी आणि कसा करायचा अर्ज यासंदर्भातील अधिक डिटेल्स जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 2 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर या जागांसाठी अर्ज करायचा आहे. rrcpryj.org  या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तिथे तुम्हाला अर्ज करता येणार आहे. प्रयागराज, झांसी आणि आगरा डिव्हिजनच्या रिक्त जागांसाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. 


या जागेसाठी अर्ज करण्याआधी या गोष्टी लक्षात घ्या


अर्ज करणाऱ्या उमेदवाराची पात्रता किमान 10 वी पास असणं आवश्यक आहे. 50 टक्क्यांसह दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार रेल्वेतील जागांसाठी अर्ज करू शकतात. NCVT शी संलग्न ITI प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे. याशिवाय 8 वी पास वेल्डर, वायरमन आणि सुतार व्यापारासाठी देखील अर्ज करू शकतात. अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु .100/- आहे.


1664 पदांवर भरती 


उत्तर मध्य रेल्वेने 1664 रिक्त जागा भरण्यासाठी ही अधिसूचना जारी केली. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे ठेवण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 सप्टेंबर 2021 आहे. अर्जदारांना 1 सप्टेंबरपर्यंत त्यांचा फॉर्म भरावा लागेल. सुतार, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पेंटर, पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन, डाइस, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेटर एसी मेकॅनिक इत्यादी या भरती प्रक्रियेअंतर्गत ठेवण्यात आल्या आहेत.