मुंबई : फक्त भारतच नाही तर कित्येक देशांकडून कोरोनावर लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे हजारो लोकांचे  प्राण गेले आहेत. अचानाक उदयास आलेल्या या आजारावर कोणत्याही प्रकारचे औषध कोणत्याच देशाकडे नव्हते, पण आता अनेक देश या महामारीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान अंतरराष्ट्रीय जॉनसन ऍण्ड जॉनसन (Johnson & Johanson) कंपनीने  कोरोनावर लस शेधली आहे.  कंपनाच्या वैज्ञानिकांनी कोरोनावर लस विकसीत केली असल्याचा दावा केला आहे. शिवाय ट्रायलला लवकरच सुरूवात करण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉनसन ऍण्ड जॉनसनच्या म्हणण्यानुसार कंपनी आणि बायोमेडिकल एडव्हास रिसर्च ऍण्ड डेवलेपमेंट अथॉरिटीच्या (BARDA) संगनमताने हे औषध विकसीत केलं आहे.  व्यापक संशोधनानंतर कंपनीने या प्राणघातक विषाणूविरूद्ध लस तयार केली आहे. 


चाचणीनंतर लवकरच जगभरात एक अब्ज लसी तयार करुन त्यांचे वितरण केले जाईल, असा महत्त्वाचा खुलासाही कंपनीकडून करण्यात आला आहे. अमेरिका, इंग्लंड आणि रशियन सरकारही या महामारीवर तोडगा काढण्यासाठी  व्यस्त आहेत.


कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगाचे मोठे नुकसान झाले आहे. या धोकादायक विषाणूची लागण  संपूर्ण जगात तब्बल ७ लाख ८५ हजार ७७७ जणांना झाली आहे. तर ३७ हजार ८१५ जाणांचा या व्हायरसने बळी घेतला आहे. दिलासादायक बातमी म्हणजे १ लाख ६५ हजार ६०७ कोरोना बाधित रुग्णांची या आजारातून सुखरूप सुटका झाली आहे.