Joint Home Loan: नोकरी मिळाल्यानंतर पुढचं पाऊल काय असेल तर ते स्वत:चं घर असतं. आजच्या या महागाईच्या काळात घर खरेदी करणं फार सोप्प नाहीये. सध्या प्रॉपर्टीचे भाव गगणाला भिडले आहेत. पण तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक उत्तम मार्ग म्हणजे गृहकर्ज (Home Loan). आज अनेक बँका आणि वित्तीय संस्था वेगवेगळ्या योजनांतर्गत लोकांना गृहकर्जाची सुविधा देतात. गृहकर्जाद्वारे घर खरेदी करणं थोडं सोप्प होतं कारण तुम्हाला कर्जाच्या रकमेतून मोठी रक्कम मिळते. पण कधीकधी एखाद्याला एकट्याने गृहकर्ज घेणे कठीण होऊ शकतं, म्हणून तुम्ही संयुक्त गृह कर्ज घेण्याचा पर्याय निवडायला हवा. या प्रकारच्या गृहकर्जाचे काय फायदे आहेत आणि ते कसे मिळवता येईल ते जाणून घेऊया...


संयुक्त गृहकर्जाचे फायदे (Joint Home Loan Benefits) :-


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संयुक्त गृहकर्ज घेण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कर्जाचा बोजा कोणावरही पडत नाही. अशा परिस्थितीत, दोन व्यक्ती मिळून कर्जाची परतफेड करू शकतात. याशिवाय, जर दोन व्यक्तींपैकी एकाचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल आणि एकत्रित उत्पन्न EMI कव्हर करण्यासाठी पुरेसे असेल, तर तुम्हाला जास्तीत जास्त कर्ज मिळू शकतं.


याशिवाय, संयुक्त गृहकर्ज घेतल्याने, दोन्ही व्यक्त आयकर कलम 80C च्या कक्षेत येतील आणि दोघांनाही कर सवलतीचा लाभ मिळू शकेल. दोघांना व्याजावर 2 लाख रुपये आणि मुद्दलावर 5 लाख रुपयांचा टॅक्स बेनिफीट मिळू शकतो.


महिला सह-अर्जदार असण्याचे फायदे


जर तुम्ही संयुक्त गृहकर्ज (Joint Home Loan) घेण्याचा विचार करत असाल, तर तुमची बहीण किंवा पत्नी एकत्र मिळून संयुक्त गृहकर्ज घेऊ शकता. जर तुम्ही एखाद्या महिलेला संयुक्त गृह कर्जामध्ये दुसरी दावेदार बनवलं तर तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.


- महिला गृहकर्ज खरेदी करणाऱ्यांसाठी अनेक कर्जदारांकडे गृहकर्जाचे व्याजदर कमी असतात.
- हा दर सामान्य गृहकर्ज दरापेक्षा सुमारे 0.5 टक्के (5 बेस पॉइंट्स) कमी आहे
- गृहकर्जामध्ये अर्जदार महिला असल्यास कमी व्याजदराचा लाभही मिळू शकतो.


संयुक्त गृहकर्जाचे तोटे (Joint Home Loan Disadvantages) :-


संयुक्त गृहकर्जचे केवळ फायदेच आहेत असं काही नाहीये, तर यामध्ये काही प्रमाणात नुकसान देखील आहे. ज्वाईंट लोन घेण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तुमचा अॅप्लिकंट ईएमआय नाही भरु शकला तर त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर होतो. याशिवाय, ज्वाईंट लोन सहजासहजी मिळू शकतं पण लोनची गॅरंटी नाही कारण, होम लोन बँकांसाठी आव्हानात्मक असतं.