पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याची ओळख पटली: कर्नाटक गृहमंत्र्यांची माहिती
देशभरातील वातावरण ढवळून टाकणाऱ्या पत्रकार गौरी लंकेश यांचा मारेकरी सापडल्याची माहिती कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी दिली आहे. मात्र, अद्याप इतर पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत त्यांनी इतर भाष्य करणे टाळले आहे.
बंगळुरू : देशभरातील वातावरण ढवळून टाकणाऱ्या पत्रकार गौरी लंकेश यांचा मारेकरी सापडल्याची माहिती कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी दिली आहे. मात्र, अद्याप इतर पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत त्यांनी इतर भाष्य करणे टाळले आहे.
पाच सप्टेंबरला अज्ञात व्यक्तींनी पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून बंगळुरूमध्ये हत्या केली होती. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. सरकार आणि यंत्रणांवर चौफेर टीका केली जात होती. त्यामुळे सरकार आणि यंत्रणांवर दबाव वाढत होता. या आधी कर्नाटकातील जेष्ठ लेखक एम एम कलबुर्गी यांचीही हत्या झाली होती. त्यामुळे हा दबाव अधिक वाढला होता. दरम्यान, गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी डोल्याला हेल्मेट घातल्यामुळे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत असूनही त्यांची ओळख पटवणे कठीण झाले होते.
दरम्यान, गौरी लंकेश आणि एम एम कलबुर्गी यांच्या हेत्येत समान धागा दिसतो आहे. त्यामुळे त्यांचे मारेकरीही सारखे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अद्याप बराच तपास बाकी असला तरी, मारेकऱ्याची ओळख पटली असल्याचे कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.