Best Stocks | High return स्टॉक्समध्ये करा गुंतवणूक; पैसाच पैसा कमावण्याची संधी
गुंतवणूकदारांसाठी 2020-2021 हे आर्थिक वर्ष भरपूर नफा मिळवून देणारं ठरलं. अनेक कंपन्यांचे रिझल्ट देखील चांगले आले आहेत.
मुंबई : गुंतवणूकदारांसाठी 2020-2021 हे आर्थिक वर्ष भरपूर नफा मिळवून देणारं ठरलं. अनेक कंपन्यांचे रिझल्ट देखील चांगले आले आहेत. कोविड 19 च्या संसर्गानंतर भारतीय अर्थव्यवस्था सुधारत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये ब्रोकरेज हाऊसने गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. Jubilant Food, Nestle, ACC, Havells India आणि Hindustan Unilever या शेअर्सचा या यादीत सामावेश आहे.
Jubilant FoodWorks
ज्युबिलंट फुडवर्क्सचा सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये नफा 58 टक्के वाढून 120 कोटींच्या जवळपास आहे. तिमाही निकालांमुळे ब्रोकरेज हाऊस या शेअरवर बुलिश आहेत. मॉर्गन स्टॅनले यांनी स्टॉकवर ओवरवेट रेटिंग दिली आहे. तसेच टार्गेट 5000 रुपये इतके निश्चित केले आहे. तसचे CLSA ने स्टॉकवर आऊटपरफॉर्म रेटिंग देत टार्गेट 4050 रुपये प्रति शेअर दिले आहे. ब्रोकरेज हाऊसच्या रिपोर्टनुसार शेअरमध्ये आणखी ग्रोथ होण्याची शक्यता आहे. शेअरची सध्याची प्राइज 3855 रुपये इतके आहे.
ACC
ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबलने ACC मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. शेअरसाठी त्यांनी 2620 रुपयांचे टार्गेट दिले आहे. मोतीलाल ओस्वालने शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला असून 2700 रुपयांचे टार्गेट दिले आहे. एसीसीचा सप्टेंबर तिमाहीमध्ये नफा वार्षिक 24 टक्क्यांनी वाढून 450 कोटी झाला आहे.
Havells India
ICICI सेक्युरिटीजने Havells India मध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. शेअरसाठी ब्रोकरेज हाऊसने 1405 रुपयांचे लक्ष देण्यात आले आहे. शेअरचा सध्याचा भाव 1266 रुपयांच्या आसपास आहे. कंपनीचा सप्टेंबर तिमाहीमध्ये वार्षिक महसुल वाढ 31.7 टक्के आहे. अर्थव्यवस्था वृद्धीचा फायदा या कंपन्यांना झाला आहे.
Hindustan Unilever
ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओस्वालने हिंदुस्तान युनिलिवर (HUL)मध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. शेअरसाठी ब्रोकरेज हाऊसने 3200 रुपयांचे लक्ष निश्चित केले आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, कंपनीचे निकाल अपेक्षित राहिले आहे. कंपनीचे प्रोडक्ट पोर्टफोलिओचे निकाल चांगले राहिले आहेत.
Nestle India
Nestle Indiaमध्ये ब्रोकरेज हाऊस शेअरखानने गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आणि टार्गेट 22,395 रुपये दिले आहे. सध्या हा शेअर 19075 रुपयांवर ट्रेड करीत आहे.