नवी दिल्ली : सीबीआय न्यायाधीश लोया केस प्रकरण सुप्रीम कोर्टात आज सुनावणी घेण्यात आली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २ फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात होणार आहे. 


कोर्टाने दिले आदेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने काही आदेश दिले आहेत. त्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या सुनावणीला स्थगिती देण्यात आली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयातील दोन प्रलंबित केसेस सर्वोच्च न्यायालयाने आपल्याकडे घेतल्या आहेत.



काय म्हणाले कोर्ट?


सर्व पक्षकारांनी आपली बाजू सविस्तर मांडावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. दोन्ही केसेसची सुनावणी सर्वोच्च न्यायालयातच होणार आहे. हे प्रकरण गंभीर असल्यामुळे सर्व पक्षकारांची बाजू ऐकून घेणे गरजेचे आहे, असेही कोर्टाने म्हटले आहे. पुढील सुनावणी २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. 




हरिश साळवेंना विरोध


याचिकाकर्त्या कडून दुष्यंत दवे सुप्रीम कोर्टात बाजू मांडत आहेत. दुष्यंत दवे यांनी महाराष्ट्र सरकारचे वकील हरिश साळवे यांना विरोध केला आहे. कारण साळवे अगोदर अमित शाह यांच्या बचावसाठी आले होते. आता महाराष्ट्र सरकार तर्फे आले आहेत. यामुळे न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन होत आहे. हरिश साळवे यांना सरकारची बाजू मांडण्यापासून थांबवा, अशी मागनी दुष्यंत दवे यांनी केली आहे.