मुंबई : 26 मे रोजी वर्षाच्या पहिल्या चंद्रग्रहणानंतर आता वर्षाचे पहिले सूर्यग्रहण (Solar Eclipse 2021) जूनमध्ये दिसणार आहे. जूनमध्ये दिसणार सूर्यग्रहण वृषभ राशीत असेल. त्याचा परिणाम मेष पासून मीन पर्यंतच्या सर्व राशींवर दिसून येईल. ज्योतिषशास्त्रात ग्रहण एक प्रभावशाली खगोलशास्त्रीय घटना मानली जाते. असे मानले जाते की आंशिक सूर्य किंवा चंद्रग्रहण देखील मानवांना प्रभावित करते. आता यंदाच्या वर्षाचा जो ग्रहण दिसणार आहे, तो 10 जून रोजी दिसणार आहे. तेव्हा गुरूवार असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्य ग्रहण भारतात दिसणार आहे. याशिवाय कॅनडा, रशिया, ग्रीनलँड, युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेतही सूर्यग्रहण दिसेल. भारतात सूर्य ग्रहण  10 जून रोजी दुपारी 1:42 ते संध्याकाळी 6:41वाजेपर्यंत दिसणार आहे. भारतात सूर्य ग्रहण अंशिक स्वरूपाचा असणार आहे. म्हणूनच, या ग्रहणात सूतक कालावधी वैध ठरणार नाही.


वर्षाचा पहिला सूर्यग्रहण वृषभ राशीवर जास्तीत जास्त परिणाम होणार आहे. त्यामुळे यावेळी वृषभ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सांगायचं झालं तर 2021 साली दोन सूर्य ग्रहण दिसणार आहे. ज्यामध्ये पहिलं ग्रहण 10 जून रोजी दिसणार असून 4 डिसेंबर रोजी दुसरं ग्रहण दिसणार आहे.