मुंबई : जंक फूडने लहानग्यांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत साऱ्यांच्या मनात वेगळीच जागा बनवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जंक फूडमुळे लहान मुलांचे नुकसान होत आहे. त्यापासून वाचण्यासाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. 9 मोठ्या कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे की, कार्टून चॅनलवर जंक फूडन दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. 


केंद्र सरकारने यावर सांगितलं की, अजून कोणताही प्रस्ताव यावर आणण्यात आलेला नाही. मात्र त्यांनी असे सांगितले की 9 मोठ्या कंपन्यांनी स्वतःहून हा निर्णय घेतलाय की कार्टून चॅनलवर जाहिराती दाखवल्या जाणार नाहीत. सूचना आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे. कोका कोला, नेस्लेसह नऊ कंपन्यांनी सरकारला तसं आश्वासन दिल्याचंही राठोड यांनी सांगितलं.


सध्या अशा जाहिरातींवर बंदी घालण्याचा कुठलाही कायदा नाही. पण नऊ कंपन्यांनी कार्टून चॅनलवर जंक फूडच्या जाहिराती न दाखविण्याचं आश्वास दिलं आहे.