Husband Wife News: उत्तर प्रदेशमधील एसडीएम ज्योती मौर्या (Jyoti Maurya) प्रकरण सध्या चर्चेत आहे. ज्योती मौर्यासारखेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. पत्नीला शिकवण्यासाठी पतीने दिवसरात्र मेहनत घेतली. मात्र पतीला नोकरी लागताच तिने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला. ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील बाराबंकी जिल्ह्यात घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, गलाहामऊ गावात ही घटना घडली आहे. या गावातील रहिवाशी अमरीश कुमार यांचे लग्न 20 फेब्रुवारी 2009 रोजी झाले होते. दीपिका भार्गवसोबत अमरीश कुमारसोबत झालं होतं. इंटर पास असलेल्या दीपिकाला लग्नानंतर शिकायची इच्छा होती. त्यामुळं लग्नानंतर दीपिकाने सासरी गेल्यानंतर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 


पती अमरीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाला शिक्षणात रस असल्यामुळं आम्ही तिला पुढे शिकण्यासाठी प्रोत्साहित केले. अमरीशने तिला एमए आणि बीएडपर्यंत शिकवले. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी कोचिंग क्लासदेखील लावले. पत्नीला कोचिंग क्लासमध्ये नेण्यासाठी व आणण्यासाठी घरातील एक व्यक्ती मदत करत होती. पत्नीच्या शिक्षणाबरोबरच पती घरातील जबाबदाऱ्यादेखील उचलत होता. याच दरम्यान 2011 मध्ये अमरीशच्या आईचे निधन झाले. 


आर्थिक चणचण असल्यामुळं अमरीश मजुरी करुन घरखर्च चालवत होता. पत्नीच्या शिक्षणासाठी 2014मध्ये त्यांनी एक एकर जमीन विकली होती. त्यानंतर 2018 मध्ये पत्नी दीपिकाची लेखपालच्या पदासाठी निवड झाली होती.


पत्नी दीपिका भार्गव यांची बस्ती जिल्ह्यातील हरैय्या तहसीलमध्ये लेखपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांनी ती आठ वर्षाच्या मुलीला घेऊन तिच्या माहेरी गेली.त्यानंतर मी तिच्याशी संपर्क साधला असता तिने मला भेटण्यास नकार दिला आणि मुलाला भेटायला गेलो असता तिने मला घरातून हाकलून दिले, असं पती अमरीश कुमार यांनी म्हटलं आहे. 


दीपिकाने पती अमरीश आणि त्याच्या कुटुंबीयांवर आरोप केले आहेत. सासरची लोक तिच्यावर अनेक अत्याचार करायचे. दीपिका घरातील कामे करुन एका खासगी विद्यालयात शिकायची. त्याबरोबर घरखर्चही चालवायची. मात्र, इतकं करुनही घरातील लोक समाधानी नव्हते. दीपिकाच्या आरोपांनुसार सासरची लोक तिचा रोज छळ करायचे. या रोजच्या छळाला वैतागून ती माहेरी गेली. त्यानंतर तिथेच शिक्षण पूर्ण करुन ती लेखापाल पदापर्यंत पोहोचली. मी आता माझ्या मुलीसोबत राहणार आहे, असं दीपिकाने म्हटलं आहे. इतकंच, नव्हे तर दीपीकाने फॅमिली कोर्टातही घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. 


दीपिकाचा पती अमरीशला मात्र घटस्फोट नको असून त्याला मुलीसोबत व पत्नीसोबत राहायचे आहे. संसार वाचवण्यासाठी त्यांने अनेकवेळा दीपिकाला विनंती केली मात्र गेल्या चार वर्षांत तिने त्याचे काहीच ऐकले नाही. 


लग्नाच्या दहा वर्षांनंतर 2018 मध्ये दीपिकाने पतीपासून घटस्फोट हवा असल्याचा अर्ज कोर्टात दाखल केला होता. मात्र कौटुंबिक न्यायालयातील प्रधान न्यायाधीश यांनी हा अर्ज फेटाळला असून आधाहीन असल्याचे सांगत 27 जुलै 2023 मध्ये फेटाळला आहे.