मुंबई : Kaam Ki Baat: आजच्या काळात बचत खात्यावरील व्याजदरात लक्षणीय घट झाली आहे. मोठ्या व्यावसायिक बँका 3-4 टक्केच व्याज देत आहेत. लहान बचत खातेधारकांसाठी हा फायदेशीर व्यवहार ठरत नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला बचत खात्यावर भरपूर व्याज मिळवायचे असेल, तर स्मॉल फायनान्स आणि पेमेंट बँक हा एक चांगला पर्याय असू शकतो. या बँकांमधील बचत खात्यांवर 7 टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याज मिळत आहे. अशा 5 बँकांबद्दल जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँक (Equitos Small Finance Bank) आपल्या ग्राहकांना बचत खात्यांवर वार्षिक 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. यासोबतच आर्थिक गरजांनुसार इतर अनेक सुविधाही बँकेत उपलब्ध होणार आहेत. या बँकेत 5 लाखांवरील ठेवींवर 7 टक्के व्याजदर आहे.



फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक (Fincare Small Finance Bank) त्यांच्या बचत खात्यांवर 7 टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याजदर देखील देत आहे. त्यासाठी ठेव पाच लाखांपेक्षा जास्त असावी. 1 लाखांपेक्षा जास्त आणि 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 6 टक्के व्याजदर आहे.


एअरटेल पेमेंट्स बँकेतील (Airtel Payments Bank) बचत खात्यावर ग्राहकांना 6 टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याज मिळत आहे. हे व्याजदर 1 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर लागू आहेत. पेमेंट्स बँकेचा दावा आहे की व्हिडिओ कॉल अ‍ॅपद्वारे ग्राहक फक्त 5 मिनिटांत खाते उघडू शकतात.



ESAF स्मॉल फायनान्स बँकेतील (ESAF Small Finance Bank) बचत खात्यात 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 4 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. त्याच वेळी, 1 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवी असलेले ग्राहक वार्षिक 6.5 टक्के व्याज घेऊ शकतात.


नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेच्या (North East Small Finance Bank) बचत खात्यावर, ग्राहक 6 टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याज मिळवू शकतात. ग्राहकांना ई-बँकिंगची सुविधाही मिळणार आहे. (टीप: लघु वित्त आणि पेमेंट बँकांचे व्याजदर तपशील त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून घेतले आहेत.)