कैफियत एक्सप्रेसच्या अपघातानंतर विरेंद्र सेहवागही संतापला !
उत्तरप्रदेशात रेल्वे अपघातांचे आणि दुर्घटनांचे सत्र अजूनही चालूच आहे. काही दिवसांपूर्वी उत्कल एक्सप्रेस रूळावरून घसरली तर आज कैफियत एक्स्प्रेसला अपघात झाला आहे.
उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेशात रेल्वे अपघातांचे आणि दुर्घटनांचे सत्र अजूनही चालूच आहे. काही दिवसांपूर्वी उत्कल एक्सप्रेस रूळावरून घसरली तर आज कैफियत एक्स्प्रेसला अपघात झाला आहे.
रेल्वेच्या वाढत्या दुर्घटनांच्या सत्रामुळे सामान्य नागरिकांप्रमाणे क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागदेखील संतापला आहे. सेहवागने रेल्वे अपघातानंतर ट्विटर एक खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सेहवाह ट्विटमध्ये म्हणतो, 'गाड्या वेळेवर येत नाहीत हे पुरेसे नव्हते तर आता त्या रूळावरही राहत नाहीत. (कोणाला) जबाबदारीच वाटत नाही. यापुढे प्रवाशांच्या जीवाचे अधिक मोल केले जावे. '
आज सकाळी कैफियत एक्सप्रेस डंपरला धडकली आणि भीषण अपघात झाला. रेल्वे इंजिनसह या एक्सप्रेसचे १० डबे रुळावरुन घसरले आहेत. या अपघातात सुमारे५० प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.
कैफियत एक्सप्रेसच्या अपघाताची माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटरवरून दिली आहे. तसेच या अपघातात जखमी झालेल्यांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच मी स्वतः या प्रकरणावर जातीने लक्ष देत आहे. अशी माहितीदेखील सुरेश प्रभूंनी ट्विटरवर दिली आहे.