मुंबई : प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली नसली राजकारणाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

63 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं कमल हसन यांनी मय्यम अॅपच्या लाँचिंगची घोषणा केलीय. या अॅपच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधणार असल्याचं हसन यांनी चेन्नईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.


पुढच्या काही दिवसांत तामिळनाडूचा दौरा करणार असून जनतेच्या समस्या जाणून घेणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. तामिळनाडूच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आपले स्वयंसेवक असून त्यांच्या कामाचं सर्व राजकीय पक्षांनी कौतुक केल्याचा दावा कमल हसन यांनी केला. लोकांमध्ये जाऊन प्रत्यक्षात काम सुरू आहे. हे काम व्यापक स्वरूपात करायचे असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.