Kangana Ranaut on Bollywood Career: कंगना रणौतने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी छाप पाडली. ती नेहमी उजवी विचारसरणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची समर्थक राहिली. दरम्यान भाजपने तिला उमेदवारी दिली आणि ती मंडीची खासदार झाली. कंगना रणौतने 2006 मध्ये 'गँगस्टर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिला बॉलिवूड इंडस्ट्रीत 18 वर्षे पूर्ण झाली. आता कंगनाने राजकारणात प्रवेश केला आहे. कंगनाला राजकारण जास्त आवडतं की बॉलीवूड? आका खासदार झाल्यावर ती अभिनय सोडणार का? असे अनेक प्रश्न तिचे चाहते विचारत असतात. हिमाचलच्या मंडीमधून खासदार म्हणून निवडून आलेल्या कंगना रणौतने नुकतीच एक मुलाखत दिली. यात तिने आपल्या करिअरबद्दल खुलासा केला.  'गँगस्टर' या सिनेमातून डेब्यू केल्यानंतर मला राजकारणात येण्याची ऑफर मिळाली होती असे कंगनाने सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी राजकारणात यावे, यासासाठी स्थानिक नेत्यांनी माझ्या कुटुंबीयांना खूपदा ऑफर केल्याचे कंगनाने सांगितले. 'द हिमाचल पॉडकास्ट'शी बोलताना तिने ही माहिती दिली.  राजकारणात येण्यासाठी माझ्याशी संपर्क साधण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. माझा पहिला चित्रपट ‘गँगस्टर’ नंतर लगेचच मला तिकीट ऑफर करण्यात आले. माझे पणजोबाही आमदार होते. त्यामुळे माझे कुटुंब राजकारणात पूर्वीपासून सक्रिय असल्याचे ती म्हणाली. 


माझ्या वडिलांनाही ऑफर मिळाली होती. माझी बहीण रंगोली जेव्हा ॲसिड हल्ल्यातून वाचली तेव्हा तिलाही राजकारणात येण्याची ऑफर आली होती अशी ऑफर आल्याचे ती म्हणाली.


'मी मंडीतील लोकांना निराश करणार नाही'


'मला 2019 मध्येही राजकारणात येण्याविषयी अप्रोच करण्यात आले होते. मी यासाठी तयार झालो नसते तर मला इतका त्रास सहन करावा लागला नसता. मी राजकारणाकडे फक्त ब्रेक म्हणून बघत नाही. हा माझ्यासाठी खूप कठीण निर्णय होता. पण मी त्यासाठी तयार असल्याचे कंगनाने सांगितले.


देवाने मला ही संधी दिल्याचे मला वाटते. मंडीतील जनतेने मला ही संधी दिली आहे. त्यांना भ्रष्ट लोकांपासून संरक्षण देणारा कोणीतरी हवा आहे. त्यामुळे मी त्यांना निराश करणार नसल्याचे कंगनाने सांगितले. 


'राजकारणापेक्षा चित्रपटात काम करणे सोपे'


राजकारण आणि अभिनय यांच्यापैकी काय निवडशील? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर तिने उत्तर दिले. राजकारण आणि अभिनय यांच्या समतोल साधण्याविषयी कंगनाने भाष्य केले. मी माझ्या आवडीचे पालन करणारी आहे. मी चित्रपट क्षेत्रात अभिनेत्री, लेखन, दिग्दर्शक आणि निर्माता क्षेत्रात आहे. अशाप्रकारे माझ्या राजकीय कारकिर्दीत जे काही करता येईल ते करेन, असे ती म्हणाली.


राजकारण करण्यापेक्षा चित्रपटात काम करणे सोपे आहे, असे माझे मत आहे. येथे खूप मेहनत घेतली जाते, असे कंगनाने म्हटले.


राजकारणासाठी चित्रपट सोडण्याचे संकेत कंगनाने याआधी दिले होते. असे असले तरी येणाऱ्या काळात तिचा 'इमर्जन्सी' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती देशाच्या माजी पंतप्रधान इंदिर गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाने स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.