Kangna Ranaut on Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरामध्ये 22 जानेवारी 2024 रोजी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना (Ram Mandir Pran Pratishtha) होणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असतानाच त्यावरून राजकारणही जोरात सुरू झालंय. काँग्रेस आणि भाजप यांच्यात वाकयुद्ध सुरू असल्याने अशातच आता कंगना राणावतने (Kangna Ranaut) अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे. अयोध्येच्या विमानतळावर आगमन झालं, यानंतर तिने पत्रकारांशी संवाद साधला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाली Kangna Ranaut ?


अयोध्या धामला भेट देणारे लोक पुण्य कमावतात. हे आमचे सर्वात मोठं 'धाम' आहे जसं व्हॅटिकन सिटीला जगात महत्त्व आहे, त्याचप्रमाणे अयोध्या धाम आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आपण भाग्यवान आहोत की प्रभू रामाने आपल्याला येथे येऊन पूजा करण्याची बुद्धी दिली आहे, असं कंगना राणावत म्हणते. काँग्रेस नेत्यांनी अयोध्येतील राम मंदिराचं निमंत्रण टाळल्याने कंगनाला यावर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा, दुर्बुद्धी असलेले आणखी काही लोक त्यांच्या धामला गेले नाहीत. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि 'रामराज्य' पुन्हा स्थापन होणार आहे, असं कंगना राणावत म्हणाली आहे.



दरम्यान, 6 डिसेंबर 1992 या दिवशी बाबरी मशीद पाडण्यात आली. तसंच त्याआधी राम मंदिर आंदोलन हे रथयात्रेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलं होतं. त्यासाठी कारसेवाही झाली होती. बाबरी पडल्यानंतर भारतात त्याचे पडसादही उमटले होते. देशभरात तणावाचं वातावरण होतं. या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमीच्या बाजूने निकाल दिल्यानंतर त्या ठिकाणी आता मंदिर उभं राहतंय.