Pulwama : कालिंदी एक्स्प्रेसमध्ये सापडललेल्या `त्या` डायरीचं पुलवामा कनेक्शन
`त्या` डायरीत लिहिलं आहे....
कानपूर : कानपूर-भिवानी कालिंदी एक्स्प्रेसमध्ये स्फोट बुधवारी एक स्फोट झाला होता. बराज्जपूर रेल्वे स्थानकात झालेल्या या कमी तीव्रतेच्या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पम, प्रवाशांमध्ये मात्र गोंधळ आणि भीतीचं वातावरण पाहायवा मिळालं. या स्फोटाची माहिती मिळताच संबंधित तपास यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. जेथे तपासादरम्यान त्यांच्या हाती एक डायरी लागली असून, त्याचे धागेदोरे पुलवामाशी जोडले गेल्याचं चित्र उघड होत आहे.
कालिंदी एक्स्प्रेसमध्ये झालेल्या स्फोटात तपास यंत्रणांच्या हाती प्लास्टिक पिशवीत असणारं जैश-ए-मोहम्मदच्या एजंटच्या नावे एक पत्र मिळाल्याचं वृत्त अमर उजालाने दिलं आहे. तर तिथेच हाती लागलेल्या एका गिन्ना, रंजीत गिहार आणि अमर सिंह यांची नावं लिहिलेली आहेत. हे तिघं शिवराजपूर गावातील असल्याचं कळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या तिघांनाही चौकशीसाठी बुधवारी रात्रीच ताब्यात घेण्यात आलं आहे. शिवाय डायरीत अशरफ आणि फिरोज ही दोन नावंही आढळली आहेत. या दोघांचाही पत्ता जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा येथील असल्याचं उघड झालंय. तर, अकरम आणि सुलेमान ही आणखी दोन नावं आढळली असून, त्यांचा पत्ता राजौरीचा असल्याचं सांगितलं जातंय.
ही डायरी मिळाल्यामुळे आणि एकंदर तणावाची परिस्थिती पाहता गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. या डायरीतील माहिती पाहता तब्बल ८ महिन्यांपासून हा हल्ल्याचा कट रचला जात होता. दर १५ दिवसांनी या स्फोटासाठी बैठक घेतली जात होती अशी माहितीही उघड होत आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात सध्या सुरक्षेचे सर्व निकष काटेकोरपणे पाळले जात आहेत. त्यातच ही माहिती समोर आल्यामुळे येत्या काळात आणखी तणावाची परिस्थिती पाहायला मिळू शकते हे नाकारता येणार नाही.