Kanpur Murder: कानपूरमध्ये (Kanpur) उद्योगपतीच्या पत्नीची हत्या करुन मृतदेह व्हीव्हीआयपी परिसरात पुरल्याप्रकरणी आरोपी विमल सोनीला (Vimal Soni) अटक करण्यात आली आहे. पोलीस चौकशीत समोर आलं की, जीन ट्रेनर विमल सोनी मिस्टर कानपूर (Mr Kanpur) आणि मिस्टर युपी (Mr UP) राहिला आहे. त्याने 'मिस्टर इंडिया' स्पर्धेतही भाग घेतला होता. पण ही स्पर्धा तो जिंकू शकला नाही. जीम ट्रेनर असल्याने विमलची सोशल मीडियावर चांगले फॉलोअर्सही होते. त्याची शरीरयष्टी पाहून अनेकजण प्रभावित होत होते आणि जीम ट्रेनिंग घेण्याची इच्छा व्यक्त करत असत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तपासात समोर आलं आहे की, जीम ट्रेनर विमलचे सोशल मीडियावर पुरुषांपेक्षा महिला फॉलोअर्सची संख्या जास्त होती. 4 महिन्यापूर्वी एकता गुप्ताची हत्या केल्यानंतर सोशल मीडियावरील अकाऊंट बंद केले होते. 


जीम ट्रेनिंगदरम्यान विमल सोनीने विवाहित एकताला आपल्या जाळ्यात ओढलं होतं. यानंतर दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. पण नंतर परिस्थिती बिघडली आणि यातूनच विमलने एकताची हत्या केली आणि मृतदेह न्यायदंडाधिकाऱ्यांच्या बंगल्याबाहेर पुरला. पण 4 महिन्यांनी अखेर तो पकडला गेला. पण तोपर्यंत एकताचा मृतदेह पूर्णपणे सडला होता. पोलिसांना नुकताच तिचा पोस्टमॉर्टम केला. 


अटक केल्यानंतर विमलने चौकशीत दावा केला आहे की, एकताच त्याच्याकडे आकर्षित झाली होती. एकता ना त्याच्याशी लग्न करत होती, ना त्याला दुसऱ्या कोणाशी लग्न करु देत होती.  याच कारणाने त्याने एकताचा काटा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 


विमल सोनीने सांगितलं की, 2010 च्या आधी त्याने 'मिस्टर कानपूर' बॉडी बिल्डरचा खिताब जिंकला होता. तसंच 'मिस्टर युपी'चा खिताबही जिंकला आहे. 2010 मध्ये मुंबईतील 'मिस्टर इंडिया' स्पर्धेतही त्याने भाग घेतला होता. पण पाचव्या क्रमांकावर पोहोचल्यानंतर तो स्पर्धेतून बाहेर पडला होता. यानंतर तो कानपूरला आला आणि वेटरचं काम सुरु केलं. 


यादरम्यान कानपूरच्या माजी दंडाधिकाऱ्यांना तो 'मिस्टर कानपूर' आणि 'मिस्टर यूपी' असल्याचं समजल्यानंतर त्यांनी डीएम बंगल्याच्या शेजारी बनवण्यात आलेल्या ऑफिसर्स क्लबमध्ये त्याला जिम ट्रेनरची नोकरी मिळवून दिली. पण काही अधिकाऱ्यांशी गैरवर्तवणूक केल्याने त्याला काढून टाकण्यात आलं. यानंतर विमलने एका आयएएस अधिकाऱ्याच्या संबंधांचा हवाला देत शिफारस केली आणि ग्रीन पार्कमध्ये जीम ट्रेनरची नोकरी मिळवली. 


24 जूनला विमल सोनीने एकता गुप्ताची ग्रीन पार्क स्टेडिअममध्ये पार्किंगमध्ये उभ्या कारमध्ये हत्या केली. हत्या करण्याआधी त्याने तिला बेशुद्ध होण्याच्या गोळ्या दिल्या होत्या. त्याने एकताच्या गळ्यावर बुक्की मारली आणि नंतर गळा दाबून हत्या केली. यानंतर मृतदेह डीएम बंगल्याच्या शेजारी असणाऱ्या ऑफिसर्स क्लबमध्ये दफन केला. 


कानपूरचे डीसीपी एसके सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकताची हत्या केल्यानंतर फरार झालेला विमल पंजाबच्या एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करत होता. यानंतर काही काळ तो ठिकठिकाणी भटकत होता. यावेळी तो मोबाईल अजिबात वापरत नव्हता.