करणी सनेची २५ जानेवारीला `भारत बंद` ची हाक
करणी सेनेने २५ जानेवारीला `भारत बंद` ची हाक दिली आहे.
नवी दिल्ली : 'पद्मावत' सिनेमाला विरोध करणारी करणी सेना मागे हटण्याच नाव घेत नाहीए. करणी सेनेने २५ जानेवारीला 'भारत बंद' ची हाक दिली आहे.
तर दुसरीकडे दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी करणी सेना प्रमुख लोकेंद्र सिंह कालवी यांना सिनेमा पाहण्यास आमंत्रित केले आहे.
'सर्वांना सिनेमा दाखवा'
भन्सालीने सिनेमा पाहण्यास बोलविल्याचे जयपुरमध्ये झालेल्या संवाददाता संम्मेलनात कालवी यांनी सांगितले.
पण ज्यांना हा सिनेमा दाखवला गेला नाहीए अशा सर्वांना सिनेमा दाखवावा अशी मागणी यावेळी कालवी यांनी केली.
सिनेमा थिएटर्सच्या मालकांनाही कालवी यांनी धमकी दिली आहे. ' थिएटर मालकांनी ठरवावे की ते कोणासोबत आहेत नाहीतर....' असे त्यांनी धमाकावले आहे.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय
सुप्रीम कोर्टानेही याप्रकरणी निर्णय दिला आहे. 'पद्मावत' कोणत्याच राज्यात बॅन नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. हा सिनेमा सर्व राज्यात प्रदर्शित होणार आहे. तरीही करणी सेनेचा विरोध कायम आहे.
भारत बंद
'पद्मावत' सिनेमा २५ जानेवारी ला रिलीज करण्याचा रस्ता मोकळा आहे.
पण करणी सेनेने 'भारत बंद' चा निर्णय घेतल्याने कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होणार आहे.