करौली, राजस्थान, Rajasthan Karauli Violence: नववर्षानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीवर दगडफेकीनंतर जाळपोळ झाल्याच्या घटनेनंतर परिस्थिती तणावाची झाली आहे. जाळपोळीच्या घटनेदरम्यान, करौली शहरातील फुटा कोट परिसरासह इतर भागातही असेच भयावह दृश्य पाहायला मिळाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करौली शहरातील फोटा कोट परिसरात नववर्षाच्या निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीवर दगडफेकीनंतर जाळपोळ झाल्याची घटना घडली. या वेळी करौली शहरातील फोटा कोट परिसरासह इतर भागातही तणाव निर्माण झाला होता. अचानक घडलेल्या या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले, दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.


दंगलीमध्ये एका दुकानला आग लावण्यात आली होती. त्या दुकानात लहान मुलगी आणि महिला होत्या. त्यांना आगीच्या झळा बसत असताना एक पोलीस तेथे देवदुतासारखा धावून आला. त्यांनी भडकलेल्या आगीतून लहान मुली आणि महिलांना बाहेर काढले. या पोलीस हवालदाराचे नाव नेत्रेश शर्मा आहे. शर्मा यांचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


तणावग्रस्त भागात कायदा सुव्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी गेलेले कॉन्स्टेबल नेत्रेश यांना आगीच्या लोळांमध्ये लहान मुलगी आणि महिला दिसल्या. नेत्रेशने पटकन महिलांची ओढणी घेत. ती त्या लहान मुलीला गुंडाळत आगीतून बाहेर काढले. पेटलेल्या दुकानांमध्ये हवालदार नेत्रेश यांनी जीवाची पर्वा न करता मुलगी व महिलांना सुखरूप बाहेर काढले.


कॉन्स्टेबल नेत्रेशच्या या कार्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी असून नेत्रेशच्या या कार्याचे जिल्ह्यासह राज्यात कौतुक होत आहे. नेत्रेशचे शौर्य पाहून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही त्यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले.तसेच त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी नेत्रेशला कॉन्स्टेबल ते हेड कॉन्स्टेबल पदोन्नती देण्याचे आश्वासन दिले.