बंगळुरु : कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकारवर टांगती तलवार आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांने दावा केला आहे की, पक्षाचे ३ आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. जे सध्या मुंबईमध्ये आहेत. कर्नाटकचे जलसंपदा मंत्री डी के. शिवकुमार यांनी रविवार म्हटलं की, राज्यातील आघाडी (काँग्रेस- जेडीएस) सरकारला पाडण्यासाठी भाजपचं 'ऑपरेशन लोटस' सुरु झालं आहे. त्यांनी आरोप केला आहे की, काँग्रेसचे ३ आमदार मुंबईच्या एका हॉटेलमध्ये भाजपच्या काही नेत्यांसोबत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस नेता शिवकुमार यांनी म्हटलं की, 'राज्यात आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आमचे ३ आमदार भाजपच्या काही आमदारांसोबत आणि नेत्यांसोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये आहेत. त्यांना तिथे किती रक्कम ऑफर करण्यात आली. ते आम्हाला माहित आहे.' 


२००८ मध्ये भाजपचे बीएस येदियुरप्पा यांनी आपलं सरकार स्थापन करण्यासाठी आणि स्थिर करण्यासाठी अनेक विरोधी पक्षाच्या लोकांना आपल्याकडे खेचलं होतं. त्यावेळी ते ऑपरेशन लोटस नावाने चर्चेत आलं होतं.


शिवकुमार यांनी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यावर भाजप प्रति उदार होण्याचे आरोप लावले आहेत. त्यांनी म्हटलं की,  आमचे मुख्यमंत्री भाजपच्या प्रति उदार आहेत. जो प्रयत्न सुरु आहे त्याबाबत त्यांनी सगळ्या आमदारांना याची माहिती दिली. त्यांनी सिद्धरमैया यांना देखील याबाबत माहिती दिली. पण मुख्यमंत्री पाहत राहण्याच्या भूमिकेत आहेत. जर मी त्यांच्या जागी असतो तर २४ तासात याचा खुलासा केला असता. पण भाजपचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. 'तुम्ही म्हणताय की मकर संक्रांतीनंतर एक क्रांती होईल. असं देखील त्यांनी म्हटलं.


काँग्रेसच्या देखील अनेक आमदारांनी असा आरोप केला आहे की भाजपकडून त्यांना संपर्क करण्यात आला. पण भगवा दलने हे आरोप फेटाळून लावले आहेत.