मुंबई : आजचा दिवस अत्यंत दुर्दैवी ठरला आहे. नोखा बीकानेरमध्ये रस्ते अपघातात 11 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर बंगलुरू येथे पहाटे 2 वाजता झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांनी आपला जीव गमावला. या दोन्ही अपघातांची तीव्रता अधिक आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगलूरूमधील अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश. भरधाव वेगात असलेल्या कारने बाऊंड्री वॉलला जोरात धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की कारने तेथेच पलटी घेतली. यामध्ये भीषण अपघात झाला. अपघात एवढा भयानक होता की 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. एका व्यक्तीला तात्काळ रूग्णालयात दाखल कऱण्यात आलं. पण त्यांना तेथे त्याला मृत घोषित करण्यात आला. यामध्ये करूण सागर नावाच्या तरूणाचा समावेश आहे. जो तामिळनाडूमधील आमदार प्रकाश यांचा मुलगा असल्याचं म्हटलं जातंय.



नोखा बीकानेरमध्ये रस्ते अपघातात 11 जणांनी आपला जीव गमावला आहे.  ट्रेलरने टक्कर दिल्यामुळे या क्रुझर गाडीचा भीषण अपघात झाला हे. यामध्ये असलेल्या 11 जणांचा मृत्यू झाला आहे. नोखाच्या जवळ असलेल्या श्रीबालाजीजवळ हा अपघात झाला होता. अपघातात मृत्यूमुखी पडलेले सजनखेडाव दोलतपुर येथे राहणारे होते.