बंगळुरू : मे महिन्याच्या २८ तारखेला विधानसभेची मुदत संपत असली, तरी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास दोन महिने आधीच जाहीर होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळी ११ वाजता निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे आजपासून कर्नाटकमध्ये आचार संहिता लागू होईल. राज्यातल्या निवडणूक प्रचाराला याआधीच रंग चढलाय.


राज्यातील २२४ विधानसभा जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. २०१३ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण २२४ जागांपैंकी १२२ जागा काँग्रेसकडे तर भाजपच्या खात्यात ४० गेल्या होत्या. तर भाजपशी काडीमोड घेणाऱ्या बीएस येडियुरप्पा यांच्या खात्यात केवळ ६ जागा आल्या होत्या.