कर्नाटकात जेडीएस-काँग्रेस सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसच्या बैठका
कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात आले आहे.
बंगळुरु : कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात आले आहे. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसच्या रात्रभर बैठका झाल्या. पक्षाची सर्व जबाबदारी सिद्धरामय्यांवर सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे ९ आणि जेडीएसचे ३ अशा १२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे राजीनामा सोपला आहे. मात्र आज अध्यक्ष त्यांच्या कार्यालयात नव्हते. आज सुटी असल्यामुळे आता याबाबत सोमवारीच निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, यावर मंगळवारी निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आपला राजीनामा सादर केल्यानंतर आमदारांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतली असून कुमारस्वामींना बहुमत सादर करण्यास सांगावे, अशी मागणी केली आहे. त्यानंतर काँग्रेसचे सर्व आमदार विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत. वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये हे सर्व आमदार उतरले आहेत. मुख्यमंत्री कुमारस्वामी सध्या परदेशात असून आज बंगळुरूला पोहोचतील. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काँग्रेसे महासचिव वेणूगोपाल यांनाही बंगळुरुमध्ये धाव घेतली आहे. त्यांना काँग्रेसकडून पाठविण्यात आली आहे. कुमारस्वामी सरकारमधील काँग्रेस नेता आणि मंत्री डी शिवकुमार यांनी नाराज असलेल्या आमदारांची काल भेट घेतली. दिल्लीतही याबाबत बैठकांचे सत्र सुरू आहे. गुलाम नबी आझाद, अहमद पटेल, आनंद शर्मा आणि ए. के. अँटनी या बैठकीसाठी उपस्थित होते.
कर्नाटक विधानसभेतले सध्याचे पक्षीय बलाबल विचाराता घेता जेडीएस-काँग्रेसचे १०५ आणि भाजपचे १०५ तर अपक्ष २ आमदार आहेत. त्यामुळे अपक्षांवर सरकारचे भवितव्य अबलंबू असणार आहे. त्यामुळे त्यांना अधिक भाव आला आहे. दरम्यान,काँग्रेसच्या २ आमदारांनी यापूर्वीच राजीनामा दिला होता. आजचे राजीनामे मंजूर झाले, तर विधानसभेचं चित्र वेगळे असेल. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस - जेडीएस यांच्या आमदारांची संख्या समसमान होणार आहे. ती १०५ वर असणार आहे. त्यामुळे अपक्ष दोन आमदरांवर पुढील सरकार अबलंबून असेल अशी शक्यता आहे.