नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतमोजणी सुरु असून भाजप बहुमताकडे वाटचाल करतेय. एकीकडे भाजपच्या पारड्यात मोठ्या संख्येने मते पडतातयत मात्र दुसरीकडे काँग्रेस मोठ्या संख्येने पिछाडीवर आहे. निवडणुकीचे निकाल येणे सुरु होताच सोशल मीडियावरही काँग्रेसला ट्रोल करण्यास सुरुवात झालीये. सुरुवातीला काँग्रेस- भाजप यांच्यात जोरदार काँटे की टक्कर होती. मात्र त्यानंतर हळूहळू काँग्रेस पिछाडीवर जाण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अनेक युझर्सनी काँग्रेसवर जोरदार टीका करण्यास सुरवात केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ताजे अपडेट कुठे पाहाल?
दरम्यान, आजच्या निकालाचे ताजे अपडेट आपणही जाणून घेऊ शकता. निकालाचे ताजे अपडेट आपल्याला  http://zeenews.india.com/marathi/live  पाहता येतील.