Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभेच्या मतदानाला काही दिवसांचाच अवधी उरला असताना आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं आहे. आता काँग्रेसच्या (Congress) एका जाहीरातीने (Advertisement) नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भाजपने (BJP) याप्रकरणी कर्नाटक काँग्रेस कमिटी, काँग्रेस नेते डीके शिवकुमार, सिद्धरमैया आणि राहुल गांधी यांना कायदेशीर नोटीस पाठवली असून निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रारही केली आहे. निवडणूक आयोगानेही हा प्रकार गांभीर्याने घेत हा प्रकार आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. तसंच वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरातीप्रकरणी आयोगाने काँग्रेसला कारणं दाखवा नोटीस बजावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

24 तासात उत्तर देण्याचे आदेश
निवडणूक आयोगाने 7 मे रोजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत या नोटीसला उत्तर देण्याचं आदेशही दिले आहेत. निवडणूकीच्या प्रचारात विरोधी पक्षाच्या ध्येय धोरणांवर टीका केली जाऊ शकते, पण कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर टीका करण्याचा कोणालाही अधिकार नाही, या गोष्टींचा राज्यातील सामान्य नागरिकांचा कोणताही संबंध नाही असं निवडणूक आयोगाच्या नोटीशीत म्हटलं आहे. आधारहीन आरोपांवर बोलणं आणि ते प्रकाशित करणं हे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचंही निवडणूक आयोगाने म्हटलंय. 


उत्तर न दिल्यास कारवाई होणार
निवडणूक आयोगाने कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्षांच्या नावाने नोटीस जारी केली आहे. दिलेल्या वेळेत नोटीशीला उत्तर न दिल्यास यावर कोणतंही उत्तर नाही असं गृहीत धरून कारवाई केली जाईल असं निवडणूक आयोगाने बजावलं आहे. तसंच यावर कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. 


भाजपने केली तक्रार दाखल
भाजपने हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. याप्रकरणी भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. काँग्रेसने दिलेल्या जाहीरातीत भाजपावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. 2019 ते 2023 दरम्यान राज्यात कोणत्या जागेसाठी किती पैसे घेतले जातात याचा दर सांगितला आहे. 


कर्नाटकात प्रचाराला वेग
दरम्यान, कर्नाटक विधानसभा मतदानासाठी आता चार दिवसांचाच अवधी उरल्याने सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बंगळुरुमध्ये मेगा रोडा शो केला. तब्बल 26 किलोमीटराचा हा रोड शो होता. या रोड शोमुळे भाजप समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही प्रचारात वेग घेतला आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी देखील प्रचारात उतरल्या आहेत. सोनिया गांधी यांच्या जाहीर सभा होणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील सोनिया गांधी यांच्यासोबत प्रचारात उतरले आहेत. याशिवाय काँग्रेस नेता राहुल गांधी 7 मे रोजी बंगळुरुमध्येच रोड शो करणार आहेत.