बंगळुरु : कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्यात बी. एस. येडियुरप्पा अपयशी ठरल्याने त्यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली. आता पुन्हा विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत भाजपला माघार घ्यावी लागली. भाजपची रणनिती पुन्हा एकदा अपयशी ठरलेय. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत चमत्काराची भाषा भाजपकडून करण्यात आली होती. मात्र, पुन्हा एकदा काँग्रेस-जेडीएस आघाडीपुढे भाजपला हार मानावी लागली आहे. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के आर रमेश यांची बिनविरोध म्हणून निवड झालेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी भाजपकडून विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे भाजपने राजकीय मैदानातून माघार घेतली नसल्याचे दिसत होते. एकीकडे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आज विधानसभेत बहुमताच्या परीक्षेला सामोरे जात आहेत. तर दुसरीकडे भाजप अखेरचा डाव खेळलाय. मात्र, हा डावही भाजपला जिंकता आलेला नाही.  भाजपने विधानसभा अध्यक्षपदासाठी उभा केलेला उमेदवार मागे घेतला. हा डाव टाकून नव्या सरकारला भापने कोंडीत पकडण्यासाठी व्युहरचना केली होती. मात्र, अखेरच्या क्षणी माघार घेतली. 



या निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे, अशी खात्री भाजप नेत्यांनी व्यक्त केली होती. त्याच विश्वासावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, असे भाजपचे उमेदवार एस. सुरेश कुमार म्हणाले.  मात्र, बहुमत चाचणीआधी खबरदारी म्हणून काँग्रेस आणि जेडीएसने आपल्या आमदारांना व्हिप बजावलाय. त्यामुळे भाजपला संख्याबळ आपल्याकडे वळविणे जमले नाही. त्यामुळे अखेर भाजपला या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली.