हा कसला महिलांचा सन्मान? पाया पडण्यासाठी आलेल्या महिलेला मंत्र्याने लगावली कानशिलात
पाया पडण्यासाठी खाली वाकताच मंत्र्यांने महिलेला कानाखाली मारली
कर्नाटकातील (Karnataka) चामराजनगरमधून (Chamrajnagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कर्नाटकातील बसवराज बोम्मई (basavaraj bommai) सरकारमधील मंत्री व्ही. सोमन्ना (V. Somanna) सध्या खूप चर्चेत आले आहेत. चामराजनगरमध्ये भाजप (BJP) नेते आणि कर्नाटक सरकारमधील गृहनिर्माण मंत्री व्ही. सोमन्ना (V. Somanna) यांनी एका महिलेला कानशिलात लगावली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मंत्री व्ही. सोमन्ना एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चामराजनगर येथे गेले होते. तिथे सोमन्ना यांनी महिलेला कानाखाली मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Karnataka minister V Somanna Slaps Woman video viral)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये कर्नाटक सरकारचे मंत्री व्ही. सोमन्ना एका महिलेला कानाखाली मारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ गेल्या शनिवारचा आहे. मंत्री व्ही. सोमन्ना हे चामराजनगरच्या हंगला गावात जमिनीची कागदपत्रे देण्यासंदर्भातील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. त्याचवेळी एका ग्रामीण महिलेला त्याच्याशी काहीतरी बोलायचे होते. महिलेच्या आग्रहामुळे मंत्री व्ही. सोमन्ना इतके चिडले की त्यांनी तिला उघडपणे कानाखाली मारली.
मंत्र्यांवर कारवाईची मागणी
महिलेला कानाखाली मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटक सरकारचे मंत्री व्ही. सोमन्ना यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मंत्री व्ही.सोमन्ना यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे. महिलांचा सन्मान करण्याचा हा प्रकार आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती महिला मंत्री व्ही. सोमन्ना यांच्या शेजारी उभ्या असलेल्या लोकांकडे डोकावते आणि मंत्र्यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकताच तिच्या गालावर चापट मारली जाते. मात्र, त्यानंतरही ही महिला मंत्र्याच्या पायाला हात लावताना दिसली. व्हिडिओमध्ये इतर लोक महिलेला थांबवताना दिसत आहेत.