Karnataka News : कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूरमध्य (Puttur) हैराण करणारी एक घटना समोर आली आहे. पुत्तूरमध्ये राहाणाऱ्या एका कुटुंबाने वृत्तपत्रात एक जाहीरात दिली. आपल्या मुलीच्या लग्नासाठी ही जाहीरात देण्यात आली होती. मुलीसाठी अनुरुप वर हवा आहे असं या जाहीरातीत नमुद करण्यात आलं होतं. फरक फक्त इतकाच होता की ज्या मुलीच्या नावाने जाहीरात दिली होती, त्या मुलीचं 30 वर्षांपूर्वी निधन झालं आहे. या जाहीरातीने सर्वांना हैराण केलं आहे. मृत मुलीचं लग्न कसं करणार असा प्रश्न लग्नाची जाहीरात वाचणाऱ्यांना पडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना
वास्तविक कर्नाटकमधल्या दक्षिण कन्नडमधल्या ( Dakshina Kannad) एका जातीत अनोखी प्रथा आहे. या जातीत अविवाहीत मुलांचा मृत्यू झाल्यास, त्यांच्या आत्माचं लग्न लावण्याची परंपरा  (Marriage Tradition) आहे. या प्रथेला कल्याणम असं म्हटलं जातं. या प्रथेत मृत मुलगा किंवा मुलीचा आत्मा असल्याचं गृहीत धरून त्यांचं लग्न लावलं जातं. तुलुनाडू-दक्षिण कन्नड आणि उडुपीतल्या समुद्रकिनारच्या जिल्ह्यांमध्ये ही प्रथा प्रचलित आहे. स्थानिक वृत्तपत्रात दिलेल्या जाहीरातीनूसर कुलाल जाती आणि बंगेरा गोत्रातली वधु आणि वर पाहिजे, ज्यांचा साधारण तीस वर्षांपूर्वी मृत्यू झाला असावा असं लिहिण्यात आलंय. 


50 कुटुंबियांनी साधला संपर्क
वृतपत्रात आलेली ही जाहीरात सोशल मीडियावर व्हायरल झाली. यानंतर जाहीरात देणाऱ्या कुटुंबाशी जवळपास 50 जणांना संपर्क साधला. यातल्या 30 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या एका अविवाहीत तरुणाची निवड करण्यात आली. त्यानंतर मृत शोभा आणि मृत चंदप्पा यांचं कल्याणम प्रथेनुसार लग्न लावून देण्यात आलं. दक्षिण कन्नड जिल्ह्यात ही लग्न सामान्य लग्नाप्रमाणेच पार पाडली जातात. या लग्नातही संपूर्ण रिती-रिवाज पाळल्या जातात.  फरक फक्त इतकाच असतो की लग्नमंडपातील पाटावर कोणीही बसलेलं नसतं. 


का केलं जातं आत्म्याचं लग्न?
अशा विचित्र प्रथेबाबत माहिती देताना तिथले ज्येष्ठ नागरिक सांगतात आत्माला मुक्ती मिळावी यासाठी मृत अविवाहित लोकांचं लग्न लावलं जातं. इथल्या जातींमध्ये ही रुढ प्रथा आहे. हे अुनुष्ठान पूर्ण केल्याने भावी वधु आणि वर यांच्या मार्गातले सर्व अडथळे दूर होतात. या प्रथेमुळे मृत अविवाहीत तरुण-तरुणींच्या आत्माला शांती मिळते अशी इथल्या समाजात समज आहे. पण सध्या ही जाहीरत लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरलीय हे नक्की.