...म्हणून वृद्ध व्यक्तीला पोलीसांनी खेचून बाहेर काढले!
कर्नाटकमध्ये पोलीसांनी एका वृद्ध व्यक्तीला अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली.
श्रृंगेरी (चिक्कमगलूरू) : कर्नाटकमध्ये पोलीसांनी एका वृद्ध व्यक्तीला अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली. ही प्रकार कर्नाटकातील श्रृंगेरी मंदिरात झाला. मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला पोलीसांनी चक्क खेचून मंदिराबाहेर काढले.
का केले असे..?
याचे कारण म्हणजे मंदिरात माजी पंतप्रधान एच.डी. देवगौडा आणि त्याचे कुटुंबिय होते. पोलीसांचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, ही घटना श्रृंगेरी शरादाम्बा मंदिरात घडली. ही घटना घडली तेव्हा माजी पंतप्रधान एच.डी. देवगौडा मंदिरात उपस्थित होते. ही घटना व्हिडिओत कैद झाली आहे. व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, पोलीसांनी जमिनीवर बसलेल्या वृद्ध व्यक्तीच्या कॉलरला मागून पकडले आणि खेचत मंदिराबाहेर काढले. मात्र तिथे उपस्थित इतर पोलीसांनीही यावर काहीही प्रतिक्रिया दर्शवली नाही. त्यांनी बघ्याची भूमिका घेतली होती.
व्हिडिओ व्हायरल
ही घटना व्हिडिओत कैद झाल्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर संबंधित पोलीसांवर कारवाई करून आरोपी पोलीसाला निलंबित करण्यात आले.