करणी सेनेकडून लॉरेन्स बिष्णोईला ठार करणाऱ्याला ₹1,11,11,111 चं बक्षीस, म्हणाले...
Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई गँगविरोधात करणी सेनेनं ठाम भूमिका घेत उघड आव्हान दिलं आहे...
Lawrence Bishnoi : माजी आमदार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिष्णोई गँगनं या जीवघेण्या हल्ल्याची जबाबदारी घेतली. इतक्यावरच न थांबता अभिनेता सलमान खान याला धमकी देण्याचं सत्रही या गँगनं सुरूच ठेवलं. इथं लॉरेन्स बिष्णोई गँग दर दिवसागणिक एका नव्या कारणामुळं चर्चेत असतानाच आता या गँगविरोधात क्षत्रीय करणी सेनेनं टोकाचं पाऊल उचललं आहे.
कारावासात असणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई याला ठार मारणाऱ्यांसाठी करणी सेनेकडून कोट्यवधींचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. क्षत्रीय करणी सेनेचे अध्यक्ष राज शेखावत यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून बिष्णोईला संपवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना ना 1,11,11,111 चं बक्षीस दिलं जाणार असल्याचं जाहीर केल्याचं वृत्त एका प्रतिष्ठीत माध्यमसमूहानं प्रसिद्ध केलं. 'आमच्यासाखी एखाद्या रत्नाप्रमाणं असणाऱ्या अमर शहीद सुखदेव सिंह गोगामेद जी यांचा मारेकरी' असा उल्लेख करत करणी सेनेनं बिष्णोईविरोधातील रोषभावना व्यक्त केली.
सुखदेव सिंह गोगामेदी जी हे करणी सेनेचे अध्यक्ष होते. 5 डिसेंबर 2023 रोजी जयपूरमध्ये त्यांच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला होता. त्यांच्या हत्येच्या काही तासांनंतरच बिष्णोई गँगकडून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली होती. दरम्यान, क्षत्रीय करणी सेनेच्या सांगण्यानुसार संरक्षण दलाच्या सेवेत असणाऱ्या कोणालाही हे बर्षीस दिलं जाणार आहे. हे बक्षीस जाहीर करत असताना करणी सेनेच्या अध्यक्षांनी केंद्र सरकार आणि गुजरात सरकारलाही धारेवर धरलं.
हेसुद्धा वाचा : Weather Updates : महाराष्ट्रापासून 'दाना' वादळ किती दूर? कुठे सर्वाधिक धोका, कुठे उन्हाचा तडाखा? पाहा सविस्तर वृत्त...
कुठे आहे लॉरेन्स बिष्णोई...
उपलब्ध माहितीनुसार लॉरेन्स बिष्णोई गुजरातच्या साबरमती कारागृहात असून, अमली पदार्थांच्या तस्करीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करण्याचा आरोपही बिष्णोईवर असला तरीही त्याचा ताबा मात्र अद्याप मुंबई पोलिसांना मिळू शकलेला नाही.