भोपाळ : संजय लीला भंसाळींचा पद्मावती हा चित्रपट वादामध्ये अडकला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करणी सेनेसह अनेक राजपूत संघटनांनी याला विरोध केला आहे. नावामध्ये बदल, सिनेमात काही बदल करून हा चित्रपट अखेर आज रीलिज झाला आहे. 



पद्मावतला विरोध कायम  


पोलिसांच्या सुरक्षेमध्ये हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये झळकत असला तरीही काही ठिकाणी करणी सेना अजूनही चित्रपटाला विरोध कायम ठेवला आहे. सिनेमागृहांची काही ठिकाणी तोडफोड सुरू आहे.  


हे देखील वाचा : पहिल्या दिवशी 'इतकी' असेल पद्मावतची कमाई


करणी सेनेचीच गाडी फूटली 


'पद्मावत'ला विरोध करताना भोपाळमध्ये चक्क एका करणी सेनेच्या कार्यकर्त्याची गाडी फोडण्यात आली आहे. सुरेंद्र सिंह चौहान नावाच्या करणी सेनेच्या कार्यकर्त्याची स्विफ्ट गाडी जाळण्यात आली आहे. गाडीचे नुकसान झाल्यानंतर ही गाडी करणी सेनेच्या कार्यकर्त्याची असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे.  


हे देखील वाचा : पद्मावत’ सिनेमा आणि दीपिकाबाबत आलिया भटची पहिली प्रतिक्रिया!


सोशल मीडियात धुमाकूळ 


चित्रपट न पाहता, सामंजस्याची भूमिका न घेता करणीसेनेचा होणारा विरोध अनेक प्रेक्षकांना केवळ पब्लिसिटी स्टंट वाटत होता. जेव्हा करणी सेनेने स्वतःच्या कार्यकर्त्याच्या गाडीचे नुकसान केल्याचे वृत्त सोशलमीडियात समजले तेव्हा त्यावर अनेकांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त करत जैसी 'करणी' वैसी भरणीचा प्रत्यय आणून दिला आहे.  


ट्विटरच्या माध्यामातून अनेकांनी करणी सेनेच्या या 'पराक्रमा'वर आपली मतं व्यक्त केली आहेत.