रोटेशनल शिफ्टचा थेट आरोग्यावर घातक परिणाम? 'या' 6 पद्धतीने होते शरीराचे नुकसान

Side Effects of Rotating Office Shift : ऑफिसच्या सततच्या बदलत्या शिफ्टचा शरीरावर होणारा परिणाम   

| Jul 06, 2024, 15:44 PM IST

अनेक ऑफिसमध्ये कंपन्या 24*7 काम चालू ठेवण्यासाठी रोटेशनल शिफ्ट ठेवतात. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना मॉर्निंग, इविनिंग आणि नाईट शिफ्ट आणि जनरल शिफ्ट करावी लागते. अनेकदा कामाची मागणी वाढते किंवा एखादी जबाबदारी वाढते तेव्हा कर्मचाऱ्यांच्या या शिफ्ट सतत बदलत राहतात. या पद्धतीच्या इनस्टेबलिटीमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. न्युरोसर्जन डॉ. पयोज पांडेय यांनी सततच्या बदलत्या शिफ्टमुळे आरोग्यावर परिणाम होतो. 

1/7

झोपेत अडथळे

शिफ्ट ड्युटीमुळे वारंवार होणारे बदल झोपेच्या वेळेत व्यत्यय आणतात. यामुळे झोपेची कमतरता, चांगली झोप न लागणे आणि झोपेचा कालावधी कमी होणे असे होऊ शकते. त्यामुळे दिवसभर थकवा, चिडचिडेपणा आणि कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते.  

2/7

मेंटल आरोग्यावर परिणाम

शिफ्टमध्ये होणारे बदल मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करतात. झोपेची कमतरता आणि कामाच्या विचित्र तासांमुळे तणाव आणि चिंता वाढू शकते. मानसिक संतुलन बिघडल्याने नैराश्याचा धोकाही वाढतो. याशिवाय सामाजिक जीवनावरही परिणाम होतो, कारण अशा परिस्थितीत तुम्हाला Me Time मिळत नाही. या वेळेत मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवणे कठीण होते. 

3/7

हृदयाची समस्या

शिफ्टमधील नियमित बदलांमुळे झोप अनियमित होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. अनेक संशोधनांनुसार, शिफ्ट कामगारांना हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि पक्षाघाताचा धोका जास्त असतो. हे विशेषतः तणाव, अनियमित खाण्याच्या सवयी आणि झोपेची कमतरता यामुळे होते.

4/7

पचनक्रिया बिघडते

शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये पचनाच्या समस्या सामान्य आहेत. वारंवार होणाऱ्या बदलांमुळे खाण्याच्या वेळेत अनियमितता येते, ज्याचा पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे ॲसिडिटी, पोटात गॅस, अपचन आणि इतर पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

5/7

लठ्ठपणा वाढतो

असामान्य बदलांमुळे खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी आणि शारीरिक हालचाली कमी होतात, ज्यामुळे वजन वाढू शकते. कामाचे टार्गेट्स, खाण्याच्या अनियमित वेळा आणि चुकीचा आहार यामुळे अनेकदा लठ्ठपणा वाढतो.   

6/7

रोगप्रतिकार शक्ती कमी होते

झोपेची कमतरता आणि अनियमित जीवनशैलीमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. यामुळे संसर्ग आणि रोगांचा धोका वाढतो. फ्लू, सर्दी आणि इतर संसर्गजन्य रोग अनेकदा शिफ्ट कामगारांमध्ये दिसू शकतात.

7/7

मानसिक संतुलन बिघडते

सततच्या बदलत्या शिफ्टमुळे कर्मचाऱ्याला आपले वैयक्तिक दिनक्रम बनविणे कठीण होते. अशावेळी मानसिक संतुलनावर याचा परिणाम होतो. कारण खासगी आयुष्य अस्वस्थ असताना कामावर लक्ष केंद्रीत करणे कठीण होते.