चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर तामिळनाडूत सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. गेल्या महिन्याभरापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, त्यांना कावेरी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आणि चाहत्यांनी रुग्णालयासमोर प्रचंड गर्दी केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून चेन्नईत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एम. करुणानिधी यांच्यावर ११ दिवसांपासून कावेरी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती दोन दिवसांपासून जास्तच खालावली होती. त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टम अर्थात व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. करुणानिधी यांचे वय जास्त झाल्याने ते उपचारांनाही फारसा प्रतिसाद देत नव्हते. ते गेल्याचे वृत्त आल्यानंतर चाहत्यांनी आक्रोश केला. त्यांचा चाहता वर्ग शोकसागरात बुडालाय.


 तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांचे आज सायंकाळी ६.१० वाजता निधन झाले. निधनाचे वृत्त समजताच त्यांचे चाहते शोकसागरात बुडालेत. करुणानिधी यांची तब्येत चिंताजनक असल्याचे कळतात आज सकाळपासूनच कावेरी रुग्णालयाबाहेर द्रमुक कार्यकर्ते आणि करुणानिधी यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी करुणानिधी यांच्या निधनाचे वृत्त येताच कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. करुणानिधी यांच्या निधनाने संपूर्ण तामिळनाडू शोकसागरात बुडाले आहे. 


करुणानिधी यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यापासून रुग्णालयाबाहेर त्यांचे चाहते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान, करुणानिधी यांना रूग्णालयात दाखल केल्यापासून राज्यात विविध ठिकाणी प्रार्थना केली जात होती. अनेक कार्यकर्त्यांनी आत्महत्या ही केली होती. तसेच २२ जणांना त्यांच्या आजाराचे धक्का बसून त्यांचे निधन झाले होते. आपल्या राजकीय कारकिर्दीत एकूण ५ वेळा ते मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. तसेच २७ जुलैला त्यांनी द्रमुकच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारून ५० वर्षे पूर्ण झाली होती.