काश्मीरप्रश्नी अमेरिकेनं मध्यस्थी केल्यास सीरियाप्रमाणे परिस्थिती होईल- मेहबूबा मुफ्ती
काश्मीरप्रश्नी अमेरिकेनं मध्यस्थी केल्यास येथेही सीरियाप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल असं विधान जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केलं आहे. पाकिस्तानसोबत चर्चा करण्यासाठी तिस-या देशाची गरज नसल्याचं सांगत मुफ्ती यांनी फारुख अब्दुल्ला यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
श्रीनगर : काश्मीरप्रश्नी अमेरिकेनं मध्यस्थी केल्यास येथेही सीरियाप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल असं विधान जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केलं आहे. पाकिस्तानसोबत चर्चा करण्यासाठी तिस-या देशाची गरज नसल्याचं सांगत मुफ्ती यांनी फारुख अब्दुल्ला यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
जम्मू-काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भारताने चीन किंवा अमेरिका या देशांची मदत घ्यायला हवी असे नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले होते. सीरिया, अफगाणिस्तान आणि इराकमध्ये अमेरिकेने हस्तक्षेप केला होता. त्यांच्या आताच्या सद्य परिस्थितीकडे देखील त्यांनी लक्ष वेधले. फारुख अब्दुल्ला यांना या देशांसारखी स्थिती जम्मू- काश्मीरमध्ये हवी का असा सवाल विचारत मुफ्तींनी अब्दुल्ला यांच्यावर पलटवार केला.