नवी दिल्ली : ७१ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी काश्मीर प्रश्नासंबंधिही भाष्य केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ना गाली से न गोली से, काश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से' असं म्हणत मोदींनी आपल्या शैलीत काश्मीर प्रश्नावर भाष्य केलं.


काश्मीरचा प्रश्न हाताळण्यासाठी आम्ही पूर्णत: प्रतिबद्ध आहोत. या प्रश्नावर अनेकदा वाचाळ बडबड केली जाते. प्रत्येक जण एकमेकांना शिव्या द्यायला तयारच असतो. परंतु, काश्मीरची समस्या गोळीनं किंवा शिव्यांनी सुटणार नाही, काश्मीरच्या लोकांना प्रेम दिल्यानंच या समस्येचं समाधान निघू शकेल. काश्मीरला पुन्हा एकदा स्वर्ग बनवण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत, हाच संकल्प घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत आहोत, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय.


देशाची सुरक्षा आपली प्राथमिकता असायला हवी... आस्थेच्या नावावर हिंसा भारतात स्वीकार केली जाणार नाही. देश शांती, एकता आणि सद्भावनेनं चालतो. सगळ्यांना एकत्र घेऊन चालणं आपली सभ्यता आणि संस्कृती आहे, असंही यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटलं.