नवी दिल्ली : मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध इस्लामिक इमाम मोहम्मद तौहिदी यांनी याचं समर्थन केलं आहे. त्यांनी म्हटलं की, काश्मीरमधून अनुच्छेद 370 आणि अनुच्छेद 35ए हटवल्यानंतर पाकिस्तान ज्या प्रकारे याचा विरोध करतो आहे. ते योग्य नाही. काश्मीर हा पाकिस्तानचा भाग नाही. त्यांना काश्मीर कधीच मिळणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विट करत त्यांनी म्हटलं की, 'काश्मीर कधीच पाकिस्तानचा भाग नव्हता. पाकिस्तान आणि काश्मीर दोन्ही भारताचे भाग आहेत. हिंदूचे मुस्लीम झाल्यास हे सत्य बदलू शकत नाही. भारत हिंदूंची धरती आहे. भारत हा इस्लाम पेक्षा ही जुना आहे. पाकिस्तान पेक्षा ही. कृपया इमानदार बना.'



कश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष भारतसोबत युद्धाची गोष्ट करत आहेत. भारतासोबत व्य़वहार बंद करुन त्यांनी स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे.


मोदी सरकारमधील गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत अनुच्छेद 370 हटवण्याचा प्रस्ताव मांडला होता. या दरम्यान शहांनी म्हटलं होतं की, काश्मीर बद्दल जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा पाक व्याप्त काश्मीर देखील त्यामध्ये येतो. अमित शहा यांनी चीनच्या ताब्यात असलेल्या भागाचा देखील यावेळी उल्लेख केला होता.