Kashmir School Girl Viral Video : सोशल मीडिया असं प्लॅटफॉर्मवर आहे जिथे आपण आपल्या व्यथा, आपला आनंद अगदी आपलं सुख दु:खाच्या भावनांना मोकळं करतो. या सोशल मीडियामुळे देशातील अनेक धक्कादायक प्रकार आणि भयाण वास्तव समोर आले आहेत. या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओ आणि फोटोद्वारे घटनांना वाचा फोडली जाते. एवढंच नाही तर या घटनांची दखल सरकार आणि संबंधित विभागाकडून घेतली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर एका क्यूट मुलीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या लहान मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या दरबारात व्यथा मांडली आहे. या चिमुकलीने अख्खा जगासमोर एका व्हिडीओच्या माध्यमातून तिच्या गावातील शाळेचं धक्कादायक वास्तव समोर आणलं आहे. 


मोदींसमोर मांडलं भयाण वास्तव


या व्हिडीओमध्ये ती म्हणाली की, मोदींजी, तुम्ही कसे आहात, ठीक आहात का? माझं नाव सीरत नाज आहे आणि मी लोही मल्हार इथे राहते. मी सरकारी शाळेत शिकते. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही सर्वांचं ऐकालं तर माझंही ऐका. 


पुढील ती व्हिडिओमध्ये, तिच्या संपूर्ण शाळेचा फेरफटका मारते. मुख्याध्यापक कार्यालयापासून कर्मचारी कक्षापर्यंत... सीरत पुढे म्हणते की,  बघा आमचा मजला किती घाणेरडा झाला आहे आणि आम्हाला इथे बसायला लावतात. मोदींजी, कृपया एक चांगली शाळा बनवा.


शाळेचं भयाण वास्तव


या व्हिडीओमध्ये त्या चिमुकलीने मुख्याध्यापकांचं कार्यालयापासून स्टाफ रुमपर्यंत तिने सगळं दाखवलं आहे. पुढे ती त्या कुठल्या जागेवर बसून शिकतात ते दाखवलं. एक मोकळं मैदान आणि अस्वच्छ सगळीकडे...गलिच्छ आणि तुटलेले टॉयलेट ...मुलींना उघड्यावर शौच करावं लागतं असं तिने सांगितल्यावर धक्काच बसला. शाळेतील मुली कुठे शौचला जातात तो नालाही तिने दाखवला.



कुठलीही आहे ही शाळा ? 


ही मुलगी जम्मूच्या कठुआ जिल्ह्यातील लोहाई मल्हार गावची राहते. तिने लोहाई इथल्या सरकारी हायस्कूल शाळेचं भयाण वास्तव मोदीसह अख्खा जगासमोर आणलं आहे. एवढ्या कमी वयात एवढं मोठं धाडस पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ ट्वीटरवर @factual_dogra या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.