चेन्नई : तामिळनाडूत सध्या कावेरी प्रश्नावरून उठलेल्या आंदोलनात होणाऱ्या हिसेंवर सुपरस्टार रजनीकांत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी दिवसभर चेन्नईच्या विविध भागात कावेरी पाणी लवादच्या स्थापनेची मागणी करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आली. त्यापैकी एका ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांवरच हल्ला चढवला. हा व्हिडिओ ट्विट करून रजनीकांतनं या हिंसाचारावर नाराजी व्यक्त केलीय. 


तामिळनाडूत अनेक ठिकाणी निदर्शने


कावेरी प्रश्नावरुन टी-२० क्रिकेटला तामिळनाडूत विरोध होत आहे. अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. आंदोलनादरम्यान, तीन पोलिसांवर हल्ला करण्यात आलाय. याबाबत रजनीकांत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारची हिंसा ही देशाला घातक आहे. त्याचा त्वरीत बंदोबस्त केला पाहिजे. किंवा ही समस्या सोडविली पाहिजे. जो हिंसा करतो त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. दरम्यान, रजनीकांत यांनी अलिकडेच राजकीय पक्षाची स्थापना केलेय. ते या पक्षाचे प्रमुख आहेत.