मुंबई: आपला प्रत्येक दिवस गुगल कोणाला तरी अर्पण करत असते. त्यासाठी काही खास दिवस किंवा व्यक्तींची निवड करून गुगल आपल्या होम पेजवर खास डूडल बनवते. आजचा दिवसही तसा प्रत्येकासाठी खास. आज (१७ जून) Father's Day आहे. आजच्या दिवशी गुगलने अत्यंत प्रतिभाशाली असे डूडल बनवले आहे. आजचे डूडल Father's Dayला अर्पण करण्यात आले आहे. 


हाताच्या पंजाच्या रंगीबेरंगी प्रतिमा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज गुगलच्या डूडलमध्ये हाताच्या पंजाच्या ६ रंगीबेरंगी प्रतिमा दिसतात. या प्रतिमा डायनोसोरसारख्या भासतात. या वर क्लिक करताच एक पेज ओपन होते. ज्यावर फादर्स डेच्या स्टोरीज दिसतात. दरवर्षी जून महिन्याच्या तीसऱ्या दिवशी जगभरात फादर्स डे साजरा केला जातो. यंदा हा दिवस १७ जूनला साजरा होत आहे.


 मदर्स डेच्या संकल्पनेवर डूडल


आजच्या फादर्स डे वाल्या डूडलचे वैशिष्ट्य असे की आजचे डूडल हे मदर्स डेच्या संकल्पनेवर बनवले आहे. मदर्स डेलाही अशाच संकल्पनेवर डूडल बनविण्यात आले होते.