वमनपुरममध्ये सोमवारी संध्याकाळी एक दुर्घटना घडली. ज्यामध्ये मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या कारसह पाच वाहनांचा एकमेकांवर धडकून अपघात झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सीएम कोट्टायम ते तिरुवनंतपुरम परतत होता तेव्हा हा अपघात झाला. त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर अचानक एक महिला स्कूटी घेऊन राईट टर्न घेताना हा अपघात झाला. या दुर्घटनेत गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचानक घ्यावा लागला ब्रेक 
मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्याचील चालकांना अचानक ब्रेक घ्यावा लागला. ज्यामुळे मुख्यमंत्र्यांची कार, एक एस्कॉर्ट वाहन, वट्टापारा आणि कंजिरामकुलम पोलीस युनिटच्या गाड्या आणि एक रुग्णवाहिका एकमेकांवर आदळल्या. या घटनेनंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी लगेच मुख्यमंत्र्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. अनेक मेडिकल स्टाफला देखील मुख्यमंत्र्यांच्या वाहनाकडे धावत जाताना या व्हिडीओत पाहू शकतो. 



परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांची तपासणी करण्यासाठी सुरक्षा कर्मचारी वाहनांमधून उतरताना दिसले. अनेक वैद्यकीय कर्मचारीही रुग्णवाहिकेतून बाहेर पडताना दिसत होते.


अधिक माहिती घेण्यासाठी पोलिसांनी महिला दुचाकी चालकाची चौकशी सुरू केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. संभाव्य त्रुटी किंवा निष्काळजीपणा ओळखण्यासाठी पोलिसांनी या अपघाताचा कसून तपास सुरू केला आहे. या अपघाताने सर्व यंत्रणांना सतर्क केले आहे. या प्रकरणात त्या स्कूटर चालक महिलेचा तपास देखील केला जात आहे.