मुंबई : Shigella Infection: केरळमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याची गंभीर (Kerala food poisoning case) घटना समोर आली आहे. या प्रकरणात एका 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. रेस्टॉरंटमध्ये चिकन खाल्ल्यानंतर मुलीची तब्येत बिघडली. अन्नातून विषबाधा झाल्यानंतर शिगेला संसर्गामुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळमध्ये अन्नातून विषबाधा झाल्यामुळे 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू आणि 40 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर, राज्याच्या आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. आता आरोग्य विभाक या विषाणू नियंत्रणात आणण्यावर काम करत असतो. या प्रकरणी पोलिसांनी रेस्टॉरंटच्या मालकासह अन्य कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. त्याचवेळी केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत प्रशासनाला जाब विचारला आहे. हे शिगेला संसर्ग काय आहे आणि ते कसे प्राणघातक ठरु शकते हे जाणून घेऊया. 


Shigella संसर्गाबद्दल जाणून घ्या


शिगेला संसर्गग्रस्त रुग्णांना अतिसारची बाधा होते. (कधीकधी रक्तही पडते), ताप आणि ओटीपोटात खूप वेदना होतात. दुसरीकडे, जर या जीवाणूची लागण झालेली व्यक्ती आधीच आजारी असेल किंवा त्याला काही गंभीर आजार असतील तर अशा परिस्थितीत तिला ताबडतोब प्रतिजैविक देणे आवश्यक आहे. शिगेला हा एक जिवाणू संसर्ग आहे जो जगभरातील अतिसाराच्या (Diarrhea) सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे. जरी तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की एन्टरोबॅक्टर कुटुंबातील सर्व जीवाणू मानवांमध्ये रोग निर्माण करतात हे आवश्यक नाही.


आतड्यावर हल्ला करतो


शिगेला हा एक जीवाणू  असाआहे की तो आतड्यावर हल्ला करतो ज्यामुळे अतिसार, पोटदुखी आणि ताप येतो. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शनच्या मते, 'कुणालाही आजारी पाडण्यासाठी जिवाणूंची किमान संख्याही पुरेशी आहे.' हा संसर्ग त्याच्या रुग्णाच्या सामानाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्काने सहज पसरतो. तसेच याशिवाय दूषित पाण्यात पोहोणे किंवा आंघोळ केल्यानेही हा धोकादायक जीवाणू तुमचा बळी घेऊ शकतो.


शिगेलोसिस प्राणघातक आहे का?


शिगेलोसिसची लागण झाल्यानंतर रुग्ण जगत नाही का, असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. या प्रश्नाचे उत्तर देतानात डॉक्टर सांगतात की, जोपर्यंत रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत नाही तोपर्यंत या संसर्गामुळे मृत्यू होत नाही.


याचा संसर्गापासून वाचायचे कसे?


या संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी, आपण कोणत्याही प्रकारचे अन्न खायचे  किंवा पाणी वापरण्यापूर्वी आवश्यक सावधगिरी बाळगली पाहिजे. जेवण करण्यापूर्वी आणि नंतर हात चांगले धुवा. पिण्याचे पाणी स्वच्छ ठेवा. ताजी फळे आणि भाज्या आहारात वापरा. त्याच वेळी, दूध, चिकन आणि मासे यासारखे नाशवंत पदार्थ योग्य तापमानात ठेवा आणि ते योग्य प्रकारे शिजवा.