मुंबई : संविधान विरोधी वक्तव्य करणारे केरळचे मंत्री साजी चेरियन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. या वादामुळे विरोधकांकडून चेरियन यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. "मी राजीनामा दिला आहे आणि तो माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी कधीही संविधानाची बदनामी केली नाही. माध्यमांनी मी केलेलं भाषण हे अर्धवट आणि सोयीनुसार दाखवलं", अशी प्रतिक्रिया चेरियन यांनी दिली. (kerala minister saji cheriyan resigns from the state cabinet)


चेरियन नक्की काय म्हणाले होते?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"आपण सर्वच म्हणतो की आमच्याकडे एक चांगलं संविधान आहे. पण मी असं म्हणेन की संविधान अशा प्रकारे लिहिलं गेलंय की त्याचा वापर देशातील लोकांना लुटण्यासाठी केला जाऊ शकेल", असं चेरियन यांनी वक्तव्य केलं होतं. 


"राज्यघटना ब्रिटीश सरकारने संकलित केली होती. तसेच भारतीयांना संविधान याच स्वरुपात लिहिलं, जे  गेल्या 75 वर्षांपासून देशात लागू आहे", असा आरोप चेरियन यांनी केला.


"चेरियन यांनी नंतर या विधानाबद्दल खेद व्यक्त केला. तसेच दावा केला की त्यांनी केलेल्या वक्तव्यात छेडछाड करण्यात आली.  माझा राज्यघटनेच्या मूल्यांवर पूर्ण विश्वास आहे", असंही चेरियन यांनी नमूद केलं.