मुंबई : केरळमध्ये आलेल्या प्रलयानंतर अनेकांचा जीव वाचवणाऱ्या त्या देवदूताचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवारी अपघातात त्याच्या मृत्यू झाला. तो देवदूत तिरूअनन्तपुरममध्ये राहणारा असून 24 वर्षाच्या त्या तरूणाचं नाव जिनीश जेरोन असं आहे. जिनीश या तरुणाने अल्पूझा भागातील लोकांना बाहेर काढण्याचे काम केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिनीश आणि त्याचे मित्र तामिळनाडूला बाईकवरुन जात होते. उचकडा या ठिकाणी त्याची बाईक घसरली आणि तो पडला त्यात तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका लॉरीचा धक्का त्याच्या बाईकला बसला. त्याला तातडीने तिरुअनंतपुरम येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पुंथुरा येथे त्याचा सन्मान करण्यात आला. तसेच ज्या लोकांचा त्याने जीव वाचवला त्यांच्या उपस्थितीत सेंट थॉमस चर्च कब्रस्तानात अंतिम संस्कार करण्यात आला. चेंगानूरचे आमदार साजी चेरियनदेखील या अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते. 


जिनीश पूनथुराचा रहिवासी असून तो मासेमारीचा व्यवसाय करत होता. जिनीश हा पहिला मदतगार होता जो चेनगुन्नुरमध्ये लोकांच्या मदतीसाठी आला होता. ‘कोस्टल वॉरिअर’ असा त्यांचा एक ग्रुप होता. या माध्यमातून त्याच्या अन्य मित्रांनी देखील लोकांची मदत केली. या प्रलयात त्याचे घर देखील उद्धवस्त झाले होते. त्यामुळे सध्या तो भाड्याचने दुसरीकडे राहत होता. बारावी शिकलेला जिनीश वयाच्या १५ व्या वर्षापासून मच्छीमार व्यवसायात आहे. कायम लोकांची मदत करण्यात तत्पर असलेल्या जिनीशचा असा दुर्दैवी मृत्यू होईल असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया त्याच्या शेजाऱ्यांनी दिली आहे.