शबरीमला मंदिरात चार महिला पत्रकारांवर हल्ला
बुधवारी परिसरात तणावाचं वातावरण दिसलं
केरळ : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही केरळच्य शबरीमला मंदिराचे दरवाजे आज महिलांसाठी उघडू शकलेले नाहीत. शबरीमला मंदिरात सर्व वयांच्या महिलांना प्रवेश मिळावा, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला होता... तरीही लोक मंदिरासमोर घोळक्यानं उभे राहून याचा विरोध करत आहेत. धक्कादायक आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, विरोध करणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे. यामुळेच बुधवारी परिसरात तणावाचं वातावरण दिसलं.
आंदोलनकर्त्यांनी सायंकाळच्या सुमारास महिला पत्रकारांच्या गाड्यांना निशाण्यावर घेतलं... त्यांच्याकडून महिला पत्रकारांवर धक्काबुक्की करण्यात आली.
शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाविरुद्ध आंदोलनकर्त्यांनी चार महिला पत्रकारांवर हल्ला केलाय. इतकंच नाही तर त्यांनी या महिला पत्रकारांच्या गाड्यांवर दगडफेकही केली... आणि तोडफोड केली.
पोलिसांचा बंदोबस्त असूनही आंदोलनकर्ते ठिकठिकाणी महिलांना थांबवत आहेत. आंदोलनकर्त्यांकडून गाड्यांची तपासणी सुरू आहेत. पोलिसांकडून आत्तापर्यंत सात जणांना अटकही केलीय.