केरळात पावसाचे २४ बळी तर १० जण बेपत्ता, काही ठिकाणी पूर परिस्थिती
केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर जोरदार पाऊस कोसळत आहे. मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने आतापर्यंत २४ जणांचा बळा घेतला असून १० जण बेपत्ता आहेत.
कोची : केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर जोरदार पाऊस कोसळत आहे. मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने आतापर्यंत २४ जणांचा बळा घेतला असून १० जण बेपत्ता आहेत. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरग्रस्त स्थिती निर्माण झालेय. काही ठिकाणी भूस्खलना झाले असून एका लहान मुलीचा यात मृत्यू झाला. दरम्यान, कोझिकोडेमध्ये मुसळधार पावसाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
इडुक्की, वेनाद आणि कोझिकोडे जिह्यांत भूस्खलन आणि रस्त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. आपत्ती प्रशासन विभागाने कोझिकोडेतल्या पूरग्रस्त स्थितीबाबत राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाकडेही मदत मागितली आहे. कन्नूर, कोझिकोडे, कोट्टायम आणि आलपुष्पा जिह्यात बचाव शिबीर स्थापन करण्यात आली आहेत. तर जिह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे कोझिकोडेमधील कक्कयम धरण भरत आले आहे. परिसरातील लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय. कोट्टयम आलपुष्पा, वायनाड आणि कोझिकोडे जिह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मुसळधार पावसामुळे २७२ घरांचे नुकसान झाले आहे.
भारथपुझा आणि पल्लकड जिह्यातील भवानी आणि सिरूवानी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून, इडुक्की आणि मूलपेरियार तलावही भरले आहेत. या मुसळधार पावसाने केरळ आणि कर्नाटकाला जोडणारा पूल मुसळधार पावसाने वाहून गेला आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.