मुंबई: KGF चित्रपटानं बॉक्सऑफिसवर धुरळा उडवून दिला. यशला या चित्रपटामुळे केवळ प्रादेशिकच नाही तर जगभरात मोठी प्रसिद्धी मिळाली. आता सर्वांनाच KGF 2ची प्रतिक्षा असताना एक धक्कादायक बातमी येत आहे. KGF चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता यशचा चाहता असणाऱ्या एकानं आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून त्यानं टोकाचं पाऊल उचललं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेलिब्रिटींसाठी लोकांमध्ये क्रेझिनेस नेहमीच दिसतो, परंतु कधीकधी ही वेड वेड्यात बदलते. असाच एक प्रकार समोर आला आहे, एका 25 वर्षीय तरुणानं सुसाईडनोट लिहून घरात गळफास घेतला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या तरुणानं सुसाईडनोटमध्ये एक मेसेज लिहिला आहे. 


रामकृष्ण असं या तरुणाचं नाव आहे. हा तरुण कर्नाटकातीस मांड्या जिल्ह्यातील रहिवासी होता. 'KGF' चित्रपटाचा अभिनेता यश आणि कर्नाटकमधील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांचा खूप मोठा चाहता होता. आत्महत्येपूर्वी त्यानं या दोन्ही मोठ्या व्यक्तींसाठी एक संदेश लिहून आपली शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. 


अभिनेता यश आणि विरोधीपक्ष नेते सिद्धरामय्या यांचा खूप मोठा चाहता आहे. त्यांनी अंतिम संस्कारासाठी यावं अशी शेवटची इच्छा या सुसाईडनोटमध्ये रामकृष्णने लिहिली आहे. तो खूप मोठा चाहता होता. रामकृष्णाने कन्नडमध्ये एक सुसाइड नोट लिहिली होती. यात या युवकाने आपल्या दोन शेवटच्या शुभेच्छासुद्धा लिहिल्या आहेत. त्याने या चिठ्ठीत स्पष्टपणे लिहिले की तो सिद्धारमैया आणि यश दोघांचा खूप मोठा चाहता आहे आणि दोघेही त्यांच्या अंत्यसंस्कारात उपस्थित रहावेत अशी त्यांनं इच्छा व्यक्त केली आहे.




या घटनेनंतर सिद्धरामय्या आणि यश यांनी शोक व्यक्त केला आहे. 'मला वाटत नाही की मी त्याला कधी भेटलो आहे. अशा परिस्थितीत माझ्या चाहत्याला भेटणे फार वाईट आहे. इतक्या लहान वयात कुणीही आयुष्याचा शेवट करू नये. असं आवाहन देखील सिद्धरामय्या यांनी केलं आहे.


'आम्ही कलाकार तुझी शिटी आणि वाजवलेल्या टाळ्या ऐकतो आणि आमच्यावर प्रेम केले त्यासाठी जगता का? असा प्रश्न विचारला आहे. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती असं देखील त्यानं ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. तर या चाहत्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी सिद्धरामय्या अंत्यसंस्काराला पोहोचले. त्यांनी संपूर्ण कुटुंबाचं सांत्वन करत तरुणाची अंतिम इच्छा पूर्ण केली.