दिल्लीच्या खान मार्केटला जागतिक स्तरावर 22 व्या क्रमांकाचा सर्वात महागडा मुख्य रस्ता म्हणून स्थान देण्यात आलं आहे. खान मार्केटने पुन्हा एकदा भारतातील सर्वात महाग हाय स्ट्रीट म्हणून आपलं स्थान मिळवलं आहे. एका अहवालानुसा, खान मार्केटने 7 टक्के (वर्ष-दर-वर्ष) भाड्याने वाढ नोंदवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Cushman & Wakefield जगभरातील 138 शहरी आणि लक्झरी रिटेल लोकेशन्सवरील भाड्यावर लक्ष केंद्रित करतं. खान मार्केटचे वार्षिक भाडं प्रति चौरस फूट वार्षिक सुमारे 19 हाजर 330 आहे.


विशेष म्हणजे, दिल्ली-एनसीआरमध्ये भारतातील तीन सर्वात महागडे रिटेल हाय स्ट्रीट्स आहेत. खान मार्केटसह कॅनॉट प्लेस (दिल्ली) आणि गॅलेरिया मार्केट (गुडगाव) देखील APAC क्रमवारीत झळकतात. येथील वार्षिक भाडं अनुक्रमे 13 हजार 335 आणि 13 हजार 166 प्रति चौरस फूट आहे. 


बंगळुरूच्या इंदिरानगरने आशिया-पॅसिफिक प्रदेशात सर्वात जास्त भाडेवाढ पाहिली आहे. तर चेन्नईतील अण्णा नगर हे या देशात सर्वात परवडणारे ठिकाण असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. 


“जगातील टॉप रिटेल डेस्टिनेशन्समध्ये खान मार्केटचे स्थान भारताच्या रिटेल क्षेत्राची लवचिकता आणि ताकद अधोरेखित करतं. खान मार्केट प्रीमियम ब्रँड्स आणि अपस्केल बुटीकच्या क्युरेटेड मिश्रणासाठी ओळखलं जातं. हे मार्केट श्रीमंत खरेदीदारांना आकर्षित करतं. उच्च श्रेणीचे रिटेल हॉटस्पॉट म्हणून त्याची प्रतिष्ठा आणखी भक्कम झाली आहे,” असं कॅपिटल मार्केट्स आणि प्रमुख-रिटेल-इंडिया, कुशमन आणि वेकफिल्डचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ शतदल यांनी सांगितलं आहे. 


परिसरात किरकोळ जागेची मर्यादित उपलब्धता असल्याने मोठी स्पर्धा सुरु आहे, ज्याचा परिणान भाड्याच्या मूल्यावर होतो. “पुरवठ्याच्या अडचणींचा सामना करणाऱ्या मॉल्समध्ये, गर्दीने भऱलेले मुख्य रस्ते यामुळे जास्त मागणी आणि भाडेवाढ होत आहे. YTD 2024 नुसार, मुख्य रस्त्यांनी 3.8 msf भाडेतत्त्वावर नोंदवले आहे, जे वर्ष-दर-वर्ष 11 टक्के वाढ दर्शविते ,” असंही शतदल पुढे म्हणाले.


मिलानचे व्हाया मॉन्टेनापोलियन, जिथे गेल्या दोन वर्षांत भाड्यात सुमारे एक तृतीयांश वाढ झाली आहे, अहवालानुसार, न्यूयॉर्कच्या अप्पर 5 व्या अव्हेन्यूला मागे टाकून जगातील सर्वात महाग रिटेल डेस्टिनेशन बनले आहे.