मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपल्याला आश्चर्यचकीत करत असतात. सध्या एक असा व्हिडीओ समोर येत आहे. जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. खरंतर नुसतं सापाचं नाव जरी घेतलं तरी, आपल्याला भीती वाटते. कारण हा सर्वात विषारी प्राणी आहे. ज्याच्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे. त्याचा एक दंश आणि खेळ खल्लास. परंतु असे असले तरी जंगलातील इतर प्राणी-पक्षी जसे मुंगूस, मोर आणि गरुड यांच्यापासून सापाला धोका आहे. ज्यामुळे यांपासून साप लांब पळतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्हाला वाटत असेल की, मग साप किंवा हे वरीलपैकी एकादा प्राणी-पक्षी समोरा समोर आले तर काय होत असेल? 


सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये साप आणि मुंगूस समोरासमोर आले आहेत. यावेळी नक्की काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी आधी हा व्हिडीओ पाहा.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, जंगलात अचानक किंग कोब्रा आणि मुंगूस समोरासमोर येतात. स्वभावानुसार दोघांचीही जोरदार भांडणे होतात. दोघांमध्ये एवढी चुरशीची लढत सुरू आहे की ती पाहून तुमच्याही अंगावर काटा उभा राहिल. 


यामध्ये कधी साप मुंगूसवर हल्ला करतो, तर कधी मुंगूस सापावर हल्ला करतो. पण शंका अशी उभी राहाते की, यां दोघांपैकी नक्की कोण जिंकतं? तुम्ही व्हिडीओ शेवट पर्यंत पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की, त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.


जंगली प्राण्यांशी संबंधित हा व्हिडिओ africanwildlife1 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, मुंगूस आणि किंग कोब्राची लढाई. या व्हिडीओला अनेकांनी शेअर आणि लाईक केलं आहे.