King Cobra Standing Video: आकार असो किंवा प्रजाती असो साप हे कायमच चर्चेचा विषय असतात. साप पाहताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. किंग कोब्रा हा जगातील सर्वात धोकादायक साप मानला जातो. अनेकदा कोब्रा समोर आला तरी लोकांची भितीने गाळण उडते. सध्या कोब्राचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा कोब्रा साप आपल्या शेपटीच्या आधारे एखाद्या मानवाप्रमाणे उभा रहिलाय की काय असं वाटण्यासारखा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल. 


व्हिडीओमध्ये नेमकं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये दिसणारा साप 6 फुटांच्या उंचीपर्यंत आपल्या शेपटीच्या सहाय्याने उभा राहू शकतो. म्हणजेच कोणत्याही व्यक्तीच्या थेट डोळ्यात डोळे घालण्याइतक्या उंचीपर्यंत हा साप आपल्या शेपटीच्या आधारे कोणत्याही इतर गोष्टीच्या सहाय्याशिवाय उभा राहू शकतो. दुसऱ्या अर्थाने सांगायचं झाल्यास एखाद्या व्यक्तीकडून धोका वाटल्यास हा साप असा शेपटीवर उभा राहून त्याचा प्रतिकार करु शकतो.


वन अधिकारी काय म्हणाला?


भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवरुन हा व्हिडीओ शेअऱ केला आहे. या व्हिडीओमध्ये एक 10 ते 12 फूट लांबीचा साप आपल्या शेपटीच्या आधारे सरळ उभा राहिलेला दिसतो. एखाद्या व्यक्तीप्रमाणे तो दूरवरील एखादी गोष्ट पाहत असल्यासारखं या शेपटीवर उभ्या राहिलेल्या सापाला पाहिल्यावर वाटून जातं. विशेष म्हणजे सापाने इतर कोणत्याही गोष्टीचा आधार घेतलेला नाही हे पाहून लोकांना फारच आश्चर्य वाटत आहे. सुशांत नंदा यांनी कॅप्शनमध्ये, "किंग कोब्रा खरोखर थेट उभा राहू शकतो. तो एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालण्याइतक्या उंचीपर्यंत उभा राहू शकतो. जेव्हा एखाद्याविरुद्ध संघर्ष होतो तेव्हा हे साप आपल्या शरीराच्या एक तृतियांश भाग जमीनीपासून अशाप्रकारे वर उचलू शकतात," अशी माहिती दिली आहे.



व्हायरल झाला व्हिडीओ


हा व्हिडीओ लोकांना फारच आवडला असून या व्हिडीओला आतापर्यंत 2 लाख 31 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे ट्वीट व्हायरल झालं असून एक हजारांहून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे. तर 5.5 हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया नोंदवल्या असून एकाने सापांना जमीनीमधील हलचाली आणि कंपनं जाणवतात अशी कमेंट केली आहे. अन्य एकाने यावरुन साप फार दूरपर्यंत पाहू शकतात किंवा हल्ल्यासंदर्भातील नियोजन करु शकतात असं तर्क मांडलं आहे. अन्य एका व्यक्तीने आपण अशाच प्रकारचं दृष्य माझ्या गावात पाहिलं होतं असं म्हटलं आहे.