king Cobra Trending Video: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. वन्यप्राणी, सापांच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांची पसंती मिळते. सापांच्या जगाबाबत नेटकऱ्यांना कायमच उत्सुकता असते. त्यामुळे सापांचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतो. असाच एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक किंग कोब्रा पाणी पिताना दिसत आहे. सापाला पाणी पिताना पाहणं तसं दुर्मिळ असतं. पण या व्हिडीओमुळे असं दृश्य पाहणं शक्य झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किंग कोब्राला एका बाटलीच्या माध्यमातून पाणी पाजताना व्हिडीओत दिसत आहे. एक व्यक्ती बाटलीतून पाणी कधी डोक्यावर कधी तोंडात टाकत आहे. किंग कोब्राही निमूटपणे पाणी पिताना दिसत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ शेअर करत आहेत. व्हिडीओखाली नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवत आहेत.